चिखली मतदार संघातील प्रलंबित कामे मार्गी...

बांधकाम मंत्री यांनी घेतली आ.सौ.श्वेताताई महाले यांचेसोबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक...
चिखली(महेश गोंधणे):-चिखली मतदार संघाच्या आ.सौ.श्वेता  महाले यांनी दी.30 जुलै मुंबई येथे बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आणि चिखली मतदार संघातील बांधकामाशी संबंधित प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मंत्र्याशी चर्चा करून प्रलंबित कामांना हिरवी झेंडी मिळवून दिली. आ.सौ.श्वेताताई महाले यांनी प्रलंबित कामे पूर्ण होण्याकरीता ५ कामांचा वाव,खडीकरण व डांबरीकरण असा बदल करण्याबाबत मागणी केलेली होती.
 बुलढाणा जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए ते येळगाव साखळी बु. शिरपूर सोनेवाडी सावरगाव डुकरे रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे.
बुलढाणा जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए ते मालगणी,सावरगाव डुकरे,वाघापूर अंत्री कोळी,गोद्री ,चांधई रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे.
बुलढाणा जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ CC ते करणखेड,सावरखेड,कवळा,डासाळा रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे.बुलढाणा जिल्हयातील हातणी,वळती ,सोमठाणा,पेठ,आन्वी,शेलगाव जहां.ची रुंदीकरणासह सुधारणा करणे.बुलढाणा जिल्हयातील,गिरोला,सवणा,दिवठाणा, बोरगाव वसू,खंडाळाम.तेभालगाव,रोहडा,मेरा ची रुंदीकरणासह सुधारणा करणे
आमदार महोदया यांनी मागणी केल्यानुसार उपरोक्त ५ कामांचा वाव बदल करण्याची कार्यवाही प्रगतीत असून तातडीने ५ कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आ.सौ.श्वेता महाले यांना दिले आहे.
 याप्रसंगी चिखली ते मलकापूर या सुमारे 124 कोटी रुपयांच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासबंधी बांधकाम मंत्री यांचेशी आ. श्वेता महाले यांची सकारात्मक चर्चा झाली असून येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री यांनी दिले असल्याचे आ.सौ.श्वेता महाले यांनी सांगितले.   
चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध चौदा रस्त्यांचे काम जागेची अनुपलब्धता व इतर तांत्रिक कारणामुळे थांबलेले होते, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर या विविध अडचणींचा गोषवारा मांडण्यात आला व विविध अधिकाऱ्यांना विचारून या सर्व रस्त्यांचा पूर्णत्वाचा मार्ग मोकळा करण्यात आला याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता काळे तसेच उपकार्यकारी अभियंता  चिंचोले हे हजर होते.  
 याचसोबत मंत्रिमंहोदय यांचेशी चर्चा करताना आमदार सौ.श्वेता महाले यांनी काही ठिकाणी ठेकेदार, कंत्राटदार यांच्या हलगर्जी किंवा निष्काळजीपणामुळे रस्त्याला खड्डे पडणे किंवा मुदतपूर्वीच रस्ते खराब होणे या विषयासंदर्भात चर्चा केली असता, निविदेमध्ये उल्लेखित असलेल्या कालावधी पूर्वी रस्ते खराब झाल्यास किंवा रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही तो रस्ता बनवणाऱ्या ठेकेदार, कंत्राटदार यांची राहणार असून त्यामुळे काही अपघात घडून आल्यास ठेकेदार, कंत्राटदार यांच्यावर प्रस्थापित कायद्यानुसार अतिशय कडक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे सुतोवाच बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
Previous Post Next Post