अमडापूर येथे ५० लक्ष रु.ची कम्प्युटर लॅब विद्यार्थीसेवेत
अमडापूर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळेत प्रवेशोत्सव साजरा करत असतांना शाळेतील ५० लक्ष रुपयाच्या कम्प्युटर लॅबचे उद्घाटन आ.सौ.श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला लॅबचे उद्घाटन करतांना जो आनंद झाला त्यामागे थोडी कष्टमय पार्श्वभूमी असल्याने हा आनंद कित्येक पटीने मोठा वाटतो, काही दिवसांपूर्वी अमडापूर येथील या शाळेमध्ये जेव्हा या लॅबची मागणी करण्यात आली तेव्हा लॅबसाठी नियमानुसार आवश्यक असलेली जागा शाळेकडे उपलब्ध नव्हती. त्यावर उपाय म्हणून येथील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने इथे बांधलेल्या दोन वर्गखोल्या एकत्र करून नियमानुसार लॅबला जागा उपलब्ध करून दिली. पण वर्गखोल्यांचे रूपांतर लॅबमध्ये केल्यामुळे आता वर्गखोल्यांची कमतरता भासू लागली. तेव्हा गावातील अतिशय गरीब वर्गातील, अतिशय कमी उत्पन्न वर्गातील मुले या शाळेमध्ये शिकत असतानाही पालकांनी लोकवर्गणीतून शाळेला वर्गखोली बांधून दिली.
कृतीतून शिक्षणाचे महत्त्व जाणत असलेल्या सुज्ञ पालकांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता हा भविष्यासाठी आपल्या मजुरीतून जो पैसा उभा करून दिला त्याची सर करोडो रुपयांच्या अनुदानालाही येणार नाही. त्यामुळे या कम्प्युटर लॅबचे उद्घाटन केवळ भौतिक दृष्टीने नाही तर भावनिक दृष्टीनेही खूप महत्त्वाचे असून शिक्षण व तंत्रज्ञान यांच्या परीसस्पर्शाने विद्यार्थी जीवनाचे सोने व्हावे. असे या उद्घाटन प्रसंगी आ. श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या आजची पिढी सोशल मीडियामुळे विविध विषयात जागृत झाली असल्याने विद्यार्थी घडवतांना तो अधिक परिपूर्ण कसा होईल याकरिता शिक्षक जाधव सर व शिक्षिका श्रीमती शितोळे शाळेत नेहमी अपडेट राहिल्याने, तसेच विद्यार्थी, पालक, शाळा समिती, सरपंच आणि समाज यांनी तुलनात्मक विचार केल्याने शिक्षकांनी शैक्षणिक दर्जा अधिक वृद्धिंगत केला. विद्यार्थ्यांची पटसंख्या ३५ वरून १०० पर्यंत गेली. ही अतिशय अभिमानाची बाब आहे असे गौरवउदगार आ.सौ श्वेताताई महाले यांनी काढले .
या वेळी गटविकास अधिकारी सर्वश्री गजानन पोफळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येंडोले, गटशिक्षणाधिकारी रमेश पाटील,गट समन्वयक प्रवीण वायाळ, सरपंच श्रीमती वैशालीताई गवई, मा. सरपंच श्रीमती ललिताताई माळोदे,भाजपा अमडापूर मंडळ अध्यक्ष अमोल साठे,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत पाखरे,अध्यक्ष शाळा व्य.स.अरुण जाधव, उपाध्यक्ष शाळा व्य. स.मिताली जाधव,प्रवीणसेठ खंडेलवाल,विविध का.सो.अध्यक्ष गजानन चोपडे,प्रसाद देशमुख, भाजपा नेते बबनराव राऊत,योगेश जुमडे,रमेश देडे,राम देशमुख,प्रकाश निकाळजे,अक्षय आदबाने,अजमत टेलर,इमरान खान,रवी काळे, नितीन जाधव,प्रकाश खराडे,गजानन जाधव, दीपक झाडे,प्रवीण माळोदे,गणेश माळोदे,पवन दायजे,पालक,माता-भगिनी,विद्यार्थी, शिक्षकवृंद,शाळा व्य.स.सदस्य उपस्थित होते.