हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा चिखली शहरात उभारला जाणार असून माझी एक भव्य स्वप्नपूर्ती लवकरच होणार आहे.आ.सौ श्वेताताई महाले

आ.सौ श्वेताताई महाले कडून सौंदर्यीकरणासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर... शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवर हा नवीन पुतळा उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. 
त्याकरिता सध्या असलेला पुतळा काढण्याच्या कार्यवाहीला २५ जुलै रोजी सुरुवात होत आहे. तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या कार्यवाहीला उद्या सकाळी ११ वाजता प्रारंभ होत आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये १९८५ मध्ये शिवरायांचा  पुतळा न.पा द्वारे स्थापन करण्यात आला होता. त्याच जागेवर महाराजांचा भव्य असा नवीन अश्वारूढ पुतळा स्थापन केला जाणार आहे. या नवीन अश्वारूढ पुतळ्याची उंची 15 फूट असून वजन सुमारे 2200 ते 2300 किलोग्राम एवढे असणार आहे. हा पुतळा पूर्णपणे ब्राँझ धातूचा असणार असून याची निर्मिती करह: स्टुडिओ पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार ललित धनवे जे इटलीतील प्रसिद्ध शिल्पकला कंपनी एफएए यांच्या सोबत काम करतात त्यांच्या  सहाय्याने शिल्पकार श्री. प्रसाद मोडक यांनी केली आहे व या शिल्पावरील चित्रकला चित्रकार सौ. कविता देशमुख यांनी चित्रित केली आहे. 
या संबंधातील सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यासाठी आ. श्वेताताई महाले पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला असून हा माझ्या विशेष आस्थेचा विषय असल्याने  शहराच्या सौंदर्यात भर घातली जाणार असून  मानात वाढ करेल असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा शिवप्रेमींचा  विशेष आग्रह असल्याने मी राज्य शासनाकडून सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून तर आणल्याच, पण या प्रस्तावित पुतळ्यासाठी पन्नास लक्ष रुपयाचा निधीसुद्धा खेचून आणून चिखलीतील सर्व शिवप्रेमीचे स्वप्न जागवले आहे असे मनोगत आ.श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केले
सर्व प्रशासकीय मान्यता राज्य शासनाद्वारे मिळाल्या असून जिल्हास्तरीय पुतळा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबत नगरपालिकेला दि. ६ मे रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे सूचित केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर पुतळा हलवण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या असून सध्या असलेला पुतळा सुरक्षितपणे काढून पुतळ्याच्या खाली असलेल्या चौथऱ्याचे नव्याने बांधकाम केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना या जागेवर करण्यात येईल. त्या दृष्टीने बुधवारी सकाळी ११ वाजता पुतळा हलवण्याच्या कार्यवाहीला सुरुवात होत आहे. १९८५ पासून अस्तित्वात असलेल्या या जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण करण्यापूर्वी या पुतळ्याची विधिवत पूजा करून हा पुतळा हलवला जाणार आहे.
 तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही कार्यवाही होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
Previous Post Next Post