जय हरी विठ्ठल पांडुरंग। जय जय रामकृष्ण हरी ,पाऊले चालती पंढरीची वाट...आ.सौ. श्वेताताई महाले, विद्याधरजी महाले दाम्पत्य पंढरपूरला विठूरायाचरणी लीन !

जिल्ह्यातील दिंडी सोहळ्यांना आ.श्वेताताई यांच्या भेटी
सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया।
गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ!
विठ्ठलाप्रतीची भक्ती, त्याच्या दर्शनाची ओढ आणि त्याच्या कृपेसाठीची याचना ही विठ्ठलभाक्तिची आस वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूरला आपोआप घेऊन जाते. आषाढी वारी सोहळ्यानिमित्त गावोगावचे हरिभक्त पंढरीची वाट चालत असून,आज विठूरायाच्या ओढीने भक्तांचे माहेर पंढरपूर येथे आ. सौ. श्वेताताई महाले यांनी सहकुटुंब सावळ्या परब्रह्माचे मनोभावे दर्शन घेतले.पंढरीत अवघा भवताप निवारतो या संतवचनाची प्रचिती येते. परमात्मा पांडुरंगाच्या भेटीने हृदयात जागणारा भक्तिभाव अवर्णनीय आहे, असे सौ.श्वेता महाले म्हणाल्या. याप्रसंगी बळीराजा सुखी होऊ दे,सर्वांना समृद्धी दे,अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तथा राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी विद्याधरजी महाले सोबत होते.
या भेटीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त चिखलीचे भूषण ह.भ.प श्री प्रकाश महाराज जवंजाळ यांनी विठोबा-रखुमाईची सुंदर मूर्ती देऊन आ.सौ.श्वेताताई महाले व विद्याधरजी महाले यांचा सत्कार व स्वागत केले. चिखली मतदारसंघासह महाराष्ट्रातील बळीराजा सुखी होऊ दे, वारकरी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत,मातृशक्तीला सुरक्षितता, समृद्धी मिळू देत, ही विठूराया चरणी प्रार्थना केल्याचे आ.सौ.श्वेताताई महाले म्हणाल्या.
ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी !
असे म्हणत विठूनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या श्री धारेश्वर संस्थान, म्हसला या चिखली मतदारसंघातील वारकरी बांधवांच्या दिंडीचा मुक्काम आज फलटण येथे होता.
या वेळी ह.भ.प.लक्ष्मण महाराज सोळंकी, सहदेव बुवा परिहार, युवा कीर्तनकार सागर महाराज भोंडे, संजय महाराज खरात, राजू महाराज भोंडे, ऋषिकेश महाराज महाले, यश महाराज खंदारे, वेदांत महाराज सोळंकी, शिवनारायण बुवा भंदर्गे, शिवाभाऊ सोळंकी, दामू अण्णा उबाळे आदी मान्यवर उपस्तिथ होते.
"फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू ।
निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥
मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥
एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥ " या ओवी प्रमाणे वारीत सहभागी महिला भगिनींसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही आ.श्वेताताई महाले यांनी लुटला.संत ज्ञानोबारायांनीही एका अभंगात फुगडीचा उल्लेख केला आहे.
"हरि आला रंगीं ।सज्जनाचे संगीं ॥४॥
सकळ पाहे हरी ।तोचि चित्तीं धरी ॥५॥
नमन लल्लाटीं ।संसारेंसि साटी ॥६॥
वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥
ज्ञानदेवा गोडी।केली संसारा फुगडी ॥८॥" वारीदरम्यान अनेक प्रकारच्या फुगड्या आणि विविध खेळ वारकरी खेळतात.त्यातून मिळणारी ऊर्जा घेऊन पंढरीची वाटचाल करतात.वारीतील या वैष्णवांची पायधूळ लाभणे हे माझे भाग्यच आहे,असे आ.सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
धारेश्वर संस्थान येथील दिंडी सोबतच वारकरी सांप्रदायिक दिंडी सोहळा, पेठ, तालुका चिखली व वारकरी सांप्रदायिक दिंडी सोहळा, धाड येथील दिंड्यांनाही भेट देऊन दर्शन घेण्याचा मोह आमदार पाटील यांना आवरता आला नाही.
मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधरजी महाले व चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी वारकरी बांधवांसोबत चटणी, बेसन-भाकरीचा प्रसादही घेतला.
Previous Post Next Post