चिखली वकील संघाने, जनतेच्या सोयीसाठी आणि त्यांचे कष्ट दूर व्हावेत यासाठी माझ्याकडे हा प्रश्न मांडला, तेव्हा तो मी तत्काळ मार्गी लावण्याचा निश्चय केला. वकील संघाची मागणी रास्त असल्याने, मी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन चिखलीतील महसुली प्रकरणांची सुनावणी चिखली येथेच घेण्याची विनंती केली आणि अवघ्या आठ दिवसांत, राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना चिखली येथेच सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
"जवळपास ३५ वर्षांपूर्वी अशी सुनावणी एकदा सुरू झाली होती आणि आज चिखली न्यायालयीन परिसराला पुन्हा एकदा तो 'सोन्याचा दिवस' दिसला आहे", असे उद्गार ॲड. कस्तुरे यांनी काढले.
या यशामागे चिखली वकील संघाचा अथक पाठपुरावा आणि मुख्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव, विद्याधरजी महाले यांचे मंत्रालयीन स्तरावरील मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. म्हणूनच चिखली वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सोनाळकर यांनी विद्याधरजी महाले यांचा सत्कार केला तसेच आ.श्वेताताई यांचा सत्कार ,ॲड.भंडारे,ॲड.कुटे व ॲड.पाटील यांनी केला.
सत्कारास उत्तर देताना विद्याधरजी महाले यांनी सांगितले की, "लोकशाहीच्या विकासाची फळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजेत. या 'बेंच सीटिंग'मुळे अनेक नागरिकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक श्रम वाचणार आहेत." हेच तर आपले ध्येय आहे.
यावेळी आ. सौ.श्वेताताई महाले यांनी आवर्जून सांगितले की, देशाचे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायव्यवस्था यांनी नेहमीच मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चिखलीच्या न्यायव्यवस्थेने केलेली रास्त मागणी कार्यकारी मंडळापर्यंत पोहोचवून ती तत्परतेने मान्य करून घेता आली, हे मी माझे भाग्य समजते.
चिखली न्यायालयाची अद्ययावत आणि सुसज्ज इमारत अजूनही पूर्ण झालेली नाही, याची मला कल्पना आहे. पण आता सुमारे ५५ कोटी रुपये खर्चून एक अशी सुसज्ज, अत्याधुनिक लायब्ररी असलेली इमारत उभारण्याचा माझा मानस आहे, जी महाराष्ट्रासाठी एक आदर्श नमुना ठरेल. याबाबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली असून, त्यांनीही सकारात्मकता दर्शवली असून लवकरच यावरही काम सुरू होईल असे आ .सौ.श्वेताताई यांनी आशा व्यक्त केली. कार्यक्रमात ॲड.सदार यांची भाजपा वकील सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.या प्रसंगी चिखली भाजपाचे अध्यक्ष डॉ.कृष्णा सपकाळ,शहराध्यक्ष सागर पुरोहित, गटविकास अधिकारी गजानन पोफळे,सुहास शेटे (माजी नगराध्यक्ष), ॲड. मंगेश व्यवहारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे .शंतनु बोंद्रे व मनोज दांडगे,ॲड. कराडे,ॲड.गवई आणि अन्य वकील मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.