आजपासून एसटी प्रवाश्यांना नवा फायदा महामंडळाने घेतला मोठा निर्णय

 महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने प्रवाशांच्या फायद्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे, जी सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आता फक्त ₹585 व भरून तुम्ही सलग चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसने अमर्यादित प्रवास करू शकता.
 ही योजना खास करून राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांसाठी तयार करण्यात आली आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, पर्यटक, ज्येष्ठ नागरिक, प्रवासप्रेमी आणि नियमित प्रवासी यांच्यासाठी ही संधी म्हणजे एक प्रकारे ‘गिफ्ट’च ठरणार आहे.

 काय आहे ही योजना?

या नव्या योजनेअंतर्गत, तुम्ही ठरवलेले मूल्य भरून सलग चार दिवसांपर्यंत लाल साधी आणि सेमी-लक्झरी एसटी बसमधून अमर्यादित प्रवास करू शकता. या दरम्यान, तुम्ही कितीही वेळा बस बदलू शकता, आणि कोणत्याही पात्र मार्गावर प्रवास करू शकता – तेही कोणत्याही अतिरिक्त तिकीटाशिवाय.या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देणे आणि सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाची संधी उपलब्ध करून देणे.

योजना कशी कार्यान्वित होईल?

या योजनेअंतर्गत चार दिवसांचा फुल पास ₹585 मध्ये मिळेल.
सेमी-लक्झरी व साध्या एसटी बसेस मध्येच या पासचा उपयोग करता येईल.
 या पासचा वापर करताना प्रवाश्यांना फक्त आपली ओळख सादर करावी लागेल.
प्रवासादरम्यान कोणतेही अडथळे येणार नाहीत, कारण या योजनेसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
कोणते बस प्रकार योजनेत सामील आहेत?
लाल साधी बस: ग्रामीण आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी.
सेमी-लक्झरी बस,थोड्याफार सोयी सुविधा असलेली आरामदायक बस.शिवशाही व एसी बस यामध्ये मात्र या पासचा उपयोग करता येणार नाही.

प्रवाशांना मिळणारे फायदे:-

अमर्यादित प्रवास फक्त एकदाच रक्कम भरून चार दिवस सलग प्रवास करता येणार.
कमी खर्चात जास्त प्रवास: वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बचत.
पर्यटनाला चालना:- राज्यातील पर्यटकांसाठी विविध पर्यटन स्थळांना भेट देणे आता सुलभ होणार.
डिजिटल पेमेंट सुविधा: तिकिटासाठी डिजिटल पेमेंटसुद्धा स्वीकारले जात आहे.
शिवशाही बससाठी स्वतंत्र पास
जर तुम्हाला आरामदायक एसी प्रवास करायचा असेल तर MSRTC ने त्यासाठी देखील विशेष पास तयार केले आहेत:-
शिवशाही फुल पास (4 दिवस): ₹1520(प्रौढ)
शिवशाही हाफ पास (4 दिवस): ₹765(मुले)
शिवशाही फुल पास (7 दिवस): ₹3030(प्रौढ)
शिवशाही हाफ पास (7 दिवस): ₹1515(मुले)
लाल साधी बससाठी किफायतशीर पास
फुल पास (4 दिवस): ₹1170(प्रौढ)
हाफ पास (4 दिवस): ₹585(5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी)
फुल पास (7 दिवस): ₹2040(प्रौढ)
हाफ पास (7 दिवस): ₹1025(मुले)
ही पास सुविधा खूप किफायतशीर ठरते कारण वारंवार तिकीट घेण्याची गरज राहत नाही आणि वेळेचीही बचत होते.
कोणासाठी ही योजना उपयुक्त?
शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी
सरकारी कार्यालयात नोकरी करणारे
नियमित प्रवासी,ज्येष्ठ नागरिक,पर्यटन करणारे प्रवासी.

पास कुठे व कसे घ्यायचा?

सध्या या योजना अंतर्गत पास स्थानिक एसटी स्थानकावर उपलब्ध आहेत. प्रवाशांना तिकिट काउंटरवर जाऊन ओळखपत्रासह पाससाठी अर्ज करता येईल. लवकरच MSRTC च्या वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपवर ऑनलाईन पास बुकिंग देखील सुरू करण्यात येणार आहे.
Previous Post Next Post