*राष्ट्रीय मोदी सेवा समिती भारत या संघटनेच्या बुलढाणा महामंत्री पदी विजय गोंधणे यांची नियुक्ती.*

*राष्ट्रीय मोदी  सेवा समिती भारत, या समितीचे गडचिरोली नागपूर विभाग जिल्हा महामंत्री श्री गिरधर सातपुते पाटील व राष्ट्रीय मोदी सेवा समिती महिला शाखा प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती चित्रा जाधव यांच्या शिफारशीवरून राष्ट्रीय मोदी सेवा समिती केंद्रीय कार्यालय यांच्या तात्काळ प्रभावाने , चिखली शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार विजय प्रल्हादजी गोंधणे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे कार्य म्हणजे केंद्र शासनाच्या दिल्ली स्तरावरून जनहितार्थ जनतेच्या सेवेसाठी व सबका साथ सबका विकास या उद्देशाने प्रेरित होऊन विविध योजना राबविल्या जात आहेत बरेचदा असे होते की या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला कळायला उशीर होतो किंवा जनतेपर्यंत या योजना पोहोचत नाही त्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.*

Previous Post Next Post