*अज्ञात व्यक्ती ने दिलेल्या धमकी मुळे आ.श्वेताताई ना एस्कार्ट वाहनासह मिळणार सुरक्षा*

आता एस्कॉर्ट वाहनासह एक सशस्त्र पीएसआय व चार बंदुकधारी पोलिसांचे संरक्षण

अज्ञात व्यक्तींनी दिली होती  मुंडके कापण्याची व नरडीचा घोट घेण्याची धमकी
चिखली- चिखलीच्या लोकप्रिय तथा
विकासाभिमुख आमदार श्वेताताई महाले पाटील यांना अज्ञात व्यक्तीने पोस्टाद्वारे पत्र पाठवून  मुंडके कापून नरड्याचा घोट घेण्याची भाषा करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर चिखली पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी श्वेताताईच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. त्यानुसार, आता सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह चार बंदुकधारी पोलिस व एक एस्कॉर्ट वाहन त्यांच्या सुरक्षेत देण्यात आले आहे. ही सुरक्षा चोवीस तास त्यांच्याभोवती राहणार आहे.
आमदार श्वेताताई महाले पाटील यांना यापूर्वी एक शस्त्रधारी पोलिसांचे संरक्षण होते. परंतु, ज्या पद्धतीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, आणि विशिष्ट समाजाच्या नावाने हे धमकीपत्र आले, त्यानंतर बुलढाणा पोलिस अलर्ट झाले होते. श्वेताताईंच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका असल्याची जाणिव बुलढाणा पोलिसांना झाली. त्यामुळेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी राज्य सरकारच्या मान्यतेनंतर श्वेताताईंच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता श्वेताताईंना सशस्त्र पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह चार बंदुकधारी पोलिस व एस्कॉर्ट वाहनाची सुरक्षा प्राप्त राहणार आहे. पोलिस व राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मतदारसंघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Previous Post Next Post