*' सखी निवास ' च्या नावाने झोल, माजी आमदारांची झाली पोलखोल...*

*' सखी निवास ' च्या नावाने झोल, माजी आमदारांची झाली पोलखोल...*


              केंद्र आणि  राज्य सरकार गोरगरीब आणि गरजू जनतेसाठी कल्याणकारी योजना तयार करते, मात्र या योजनांचा लाभ आजवर  काँग्रेसची सत्ता असल्यामुळे याच पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातलेच एक उदाहरण चिखलीमध्ये उघड झाले असून काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार यांच्या शिक्षण संस्थेने महिला व बालविकास विभागाच्या वतीने केंद्रशासन पुरस्कृत महिलांसाठीच्या वसतिगृह ( सखी निवास  ) योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. 
                   परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेतर्फे अनुराधा नगर परिसर साकेगाव रोड येथे चालवल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी होळकर महिलांसाठीच्या वसतिगृहाची महिला व बालकल्याण आयुक्तांनी  तपासणी केली असता  यामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. संस्थेने आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली नाही. निकषानुसार प्रवेश दिला जात नाही. व्यवस्थापन समिती गठित नाही. नोकरी करणाऱ्या महिलांपेक्षा प्रशिक्षणार्थी अधिक दिसून येतात, नोकरी करणाऱ्या महिला संबंधित संस्थेतच शिक्षिका असल्याचे दिसून आले. वसतिगृहचे कामकाज मार्गदर्शक सूचनांनुसार होत नाही शिवाय, निकषानुसार दस्तऐवज ठेवलेले नाहीत. या त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्तांनी आठ दिवसाचा वेळ सदर संस्थेला दिला आहे. 
                 " हपापाचा माल गपापा  "  करणाऱ्या माजी आमदाराच्या शिक्षण संस्थेकडून शासकीय निधीचा झालेला हा अपहार व योजनेचा गैरवापर स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेण्याची माजी आमदाराची ऐतखाऊ प्रवृत्ती यातून उघड झाली आहे. आजवर शासनाकडून मिळालेल्या निधीची वसुली सरकारने सदर संस्थेकडून त्वरित करावी व दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.
Previous Post Next Post