मित्रांसोबत झालेल्या गमतीचे रूपांतर झाले चाकू बाजीत..

* *मित्रांसोबत झालेल्या गमतीचे रूपांतर झाले चाकू बाजीत...*

चिखली:- आजकालच्या मुलांना पटकन राग येतो. या ना त्या कारणाने मारामाऱ्या करतात. चिखली शहरात 4 फेब्रुवारीला दोन मित्रांनी एकाला एक  दिवस आगोदर  मफलरचा फटका मारला हा वाद मिटला होता परंतु दुसऱ्या दिवशी हातावर चाकू मारल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.

पोलीस तक्रारीनुसार, चिखली येथील गौरव सुधाकर वायाळ हा गजानन महाराज मंदिर समोरून घरी जात असताना आसाम चौकात त्याचे मित्र प्रथमेश केळोदे व साहिल शिंगणे हे उभे होते. दरम्यान साहिल शिंगणे यांने त्याच्या गळ्यातील मफलर काढून मजाक मध्ये मफलरचा फटका गौरवच्या डोळ्यावर मारला. त्यामुळे तिघांची बाचाबाची सुरू झाली. परंतु सुमित गायकवाड वअजय डोंगरदिवे या मित्रांनी हा वाद मिटवला. दरम्यान 4 फेब्रुवारीच्या रात्री गौरव नालंदा चौकात मित्रांना भेटण्यासाठी गेला असता, प्रथमेश किलोदेव साहिल शिंगणे यांनी शिवीगाळ करून पुन्हा वाद घातला. यावेळी प्रथमेश केळोदे यांनी गौरवला पकडून ठेवले आणि साहिल शिंगणे याने खिशातील चाकू काढून गौरव च्या हाताच्या ढोपरावर वार केल्यामुळे गौरवला पंधरा टाके पडले आहेत. याप्रकरणी गौरवने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
Previous Post Next Post