आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार कटिबध्द....केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव… !
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सवणा येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य रोगनिदान शिबीराचा गरजुंनी घेतला लाभ… !!
(चिखली) गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे त्यांच्यावरही चांगले उपचार झाले पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने आयुष्यमान भारत योजना संपूर्ण देशामध्ये राबवल्या जात आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहे.असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सवणा येथे मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सवणा येथील जि प प्राथमिक शाळा येथे आरोग्य शिगबीराचे उद्घाटन केले. सवणा येथील आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे खाजगी सचिव विद्याधरजी महाले, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, शहरप्रमुख विलास घोलप, नियोजन समिती अध्यक्ष कैलास भालेकर, माजी जी प सदस्य शरद हाडे, संजय भुतेकर उपस्थित होते. यावेळी शिबीरार्थींना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, या देशातील गोरगरीब जनतेला त्यांच्याच भागामध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा कशाप्रकारे मिळेल या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारकडून प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील आणि राज्यातील आरोग्याची सेवा सक्षम करून लोकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्यातील महायुतीचे सरकार कटिबध्द आहे. गोरगरीब जनतेला महानगरातील हॉस्पिटलमध्ये ही आरोग्य उपचार घेता यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविल्या जात आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. असे आवाहन केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
या शिबीरामध्ये अस्थिरोग तज्ञ, कान नाक घसा, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार तज्ञ, कर्करोग तज्ञ, बालरोग तज्ञ, पोटविकार तज्ञ, मानसिक आजार तज्ञ, हृदयरोग तज्ञ, मेदु तपासणी तज्ञ डॉक्टरांकडुन करण्यात आली. शिवाय नेत्र तपासणी मोफत चष्मे आणि औषधीचे वाटप करण्यात आले. या शिबीराचा लाभ अनेक गरजुंनी घेतला तर शिबीरामध्ये सहभागी झालेल्या परंतु गंभिर आजार असलेल्याचे निष्पंन्न झालेल्या रुग्णांवर महानगरातील दवाखान्यांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.तसेच या शिबीराचे आयोजन चिखली शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे यानी विशेष सहकार्य जिल्हा आरोग्य विभाग यंत्रणा बुलडाणा आणि चिखली यानी केले
