सिंदखेडराजा येथे गौ सन्मान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पूज्य संत श्री बालकृष्णजी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे.दिनांक ६ जून रोजी सिंदखेडराजा शहरातशहरात भरदिवसा बसस्थानकासमोर गो शाळा सम्मान अभियान अंतर्गत महाराष्ट्र प्रभारी म्हणून कार्यरत असलेले गौरक्षकाने जनावरांची गाडी अडवल्याच्या कारणावरून काही समाजकंटकांनी त्यांना मारहाण केली होती. संबंधित गौरक्षकांनी जनावरांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गाडी थांबवली.याच कारणावरून काही समाजकंटक व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली होती. भरदिवसा, सार्वजनिक ठिकाणी आणि बसस्थानकासमोर अशी घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गौरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी करिता हिंदू बांधवांकडून रास्ता रोको करण्यात आला होता त्या नंतर काही अज्ञात समाजकंटक विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच अनुषंगाने रविवारी आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेकदासजी शास्त्री महाराज (काशी, वाराणसी) यांच्या नेतृत्वाखाली संत समाज, गोभक्त आणि विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांची भेट घेऊन कठोर कारवाई व संतांच्या सुरक्षेसाठी सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांना सांगितले की, गौसंरक्षण व गौसन्मानासाठी जनजागृती करणारे पूज्य संत श्री बालकृष्णजी महाराज यांच्यावर सिंदखेडराजा येथे काही असामाजिक घटकांनी हल्ला केला. या घटनेमुळे संत समाज, धर्मप्रेमी नागरिक आणि
गोभक्तांमध्ये तीव्र संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर महाराजांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच प्रकरणाची निष्पक्ष व जलद गतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
युवाचार्य संत विवेक दासजी शास्त्री महाराज यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही संत-महंतांची आणि महान परंपरेची भूमी आहे. अशा भूमीत एखाद्या संतावर हल्ला होणे अत्यंत दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. संत समाजाला न्यायाची अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले की, पूज्य संत श्री बालकृष्णजी महाराज हे मूळ राजस्थान राज्यातील असून उत्तर भारतातील अनेक संत-महंत व धार्मिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. या घटनेची माहिती देशभर पोहोचल्याने विविध राज्यांतील संत समाजाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने आणि प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे.
यावेळी संत समाज, गोभक्त आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिष्टमंडळामध्ये अमोल अंधारे शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख,(खामगाव), उज्ज्वल गव्वाळ विदर्भ प्रमुख, गौ सन्मान अभियान शैलेश गोंधणे (चिखली), प्रशांत जैवाळ प्रसिद्धी प्रमुख, प्रमोद मापारी तसेच इतर मान्यवरांचा समावेश होता.