अनिल केशवराव पळसकर यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहिर


 संजिवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली, जि बुलढाणा  महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग शाहु, फुले, आंबेडकर व क्रिडा विभाग जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, पुरुषोत्तम खेडेकर , माजी आमदार रेखाताई खेडेकर , बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे  खासदार आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव , आ.श्वेताताई महाले ,आ.संजय गायकवाड व महाराष्ट्र शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र राजमाता जिजाऊंचा फोटो देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.  सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, कृषी, कवी, साहित्य, लेखक, पत्रकार ,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका , कृषी सहाय्यक ,तलाठी , प्राचार्य , शिक्षक, शिक्षका, डॉक्टर वकिल इजिनियर व दहावी बारावी मध्ये  उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थांचा, सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केल्या जाणार आहे. त्यामध्ये विधवा, घटस्फोटीत महिलांचा परिचय मेळावा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे . बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधवा , घटस्फोटीत महिलांनी परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी आपली उपस्थिती द्यावी त्यामध्ये सर्व विभागाचे जिल्हा अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. असे आवाहन एकल महिला नारी संघटनांच्या राष्ट्रीय अध्यक्षा  उज्वला निवृत्ती  जाधव यांनी केले आहे. त्या प्रसंगी दिनांक २६/०६/२०२६ रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. अनिल शेषराव पळसकर यांना १९८२ पासुन पत्रकारितेची आवड, चिखलीच्या समाज कारणात व राजकारणात त्यांचा मोलाचा वाटा व पत्रकारीतेतुनन त्यांनी उमटवलेला ठसा, विदर्भ दर्पण ,लोकप्रिय साय:दैनिक सल्लागार संपादक ,जेष्ठ पत्रकार अनिल पळसकर यांना सामाजिक न्याय विभागामध्ये पुरस्कार देऊन ससन्मानित करण्यात येणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मिळणार असून नाना च्या पत्रकारिते कडे पाहुन त्यांचा आदर्श घ्यावा असे शब्द रूपी कौतुक संजिवनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ निवृत्ती जाधव यांनी त्यांना पत्र देऊन जाहिर केले आहे. तरी कार्यक्रमाचे आयोजन २६/०६/२०२६ रोजी सकाळी ११ ते ३ , सामाजिक न्याय विभाग सभागृह येथे पार पडणार आहे.

Previous Post Next Post