आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान..

 निष्ठावंत सेवेला मानाचा मुजरा... आ.सौ.श्वेता महाले




महेश गोंधणे-
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, आयुष्यभर पक्षाच्या विचारासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

भारतीय जनता पक्ष हा समर्पित कार्यकर्त्यांचा पक्ष असून, त्यांच्या योगदानाची कृतज्ञतेने दखल घेणे हीच खरी परंपरा असल्याचे आणी या निष्ठावंत सेवेला आपला मानाचा मुजरा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सुमारे २५०० ज्येष्ठ कार्यकर्त्यांना "ध्येयनिष्ठ तपस्वी सन्मान पत्र" प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ व निःस्वार्थ सेवेला गौरविण्यात आले.

विविध ठिकाणी हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. पदाधिकारी, माजी पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार केला. बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीतही पक्षनिष्ठा जपली, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कार्य केले आणि पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला—या त्यांच्या योगदानाचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आमदार श्वेता महाले  यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा अधिक बळकट होत असून, हा उपक्रम पक्षाच्या मजबूत पायाभरणीचा गौरव करणारा आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरला...


Previous Post Next Post