"शासनमान्य" शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे कर्मयोध्दे दिनदर्शिका व कर्मयोध्दे वार्षिक अंक याचे थाटात विमोचन...

 बुलढाणा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉर्डन लीडर डॉ. श्रीमती रूपाली सरोदे (मानमोडे) यांच्या हस्ते थाटात विमोचन.
  
चिखली (महेश गोंधणे):-महाराष्ट्र शासनाच्या विविध भागांमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या "शासनमान्य" शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या कर्मयोद्धे दिनदर्शिका व कर्मयोद्धे वार्षिक अंक याचे आज चिखली पंचायत समिती येथे  .जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉर्डन लीडर डॉ.श्रीमती रूपाली सरोदे (मानमोडे)  यांच्या उपस्थिती थाटात विमोचन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नुकत्याच डोडा जिल्हा,जम्मू काश्मीर मध्ये सडक दुर्घटने मध्ये शहीद झालेल्या  सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.                                 जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पुनर्नियुक्त  सैनिक, आजी-माजी, सैनिक वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व विधवा व त्यांच्या पाल्यांच्या  कल्याणकारी योजना बाबतची संपूर्ण माहिती दिली व काही समस्या असल्यास मला कळवा मी ते पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ठेंग,(जलसंपदा विभाग बुलढाणा),सचिव केशव सोनुने,(जलसंपदा विभाग खामगाव), सहसचिव  राहुल गवई,(आरोग्य सेवक एकलारा) कोषाध्यक्ष रमेश जोहरे,(तहसील कार्यालय चिखली),चिखली तालुका अध्यक्ष जय शिरसाठ,(तलाठी चिखली), संग्रामपूर जळगाव जामोद तालुका अध्यक्ष  विनोद वायझोडे,(जलसंपदा विभाग शेगाव), मुख्यमार्गदर्शक  हरिदास थोलबरे,(तहसील कार्यालय चिखली), जिल्हा महिला प्रमुख (वीरपत्नी) श्रीमती उज्वला कुळकर्णी,(तलाठी बुलढाणा), लोणार तालुका अध्यक्षा श्रीमती छाया साळवे,(पंचायत समिती लोणार), आजीवन सभासद केशव पाद्रे,(भूमी अभिलेख कार्यालय जाफराबाद) आत्माराम भराड,(भूमी अभिलेख कार्यालय जाफराबाद), पंढरी सोनुने,(तहसील कार्यालय चिखली), दत्तात्रय  घ्याळ,(जलसंपदा विभाग मलकापूर), भास्कर पडघान माजी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बुलढाणा, रवी जाधव,(पंचायत समिती चिखली)  राजू झाडगे,(तहसील कार्यालय चिखली), सुनील साबळे (तलाठी चिखली) त्रिदल सैनिक संघटनेचे चिखली तालुका अध्यक्ष रामेश्वर सोळंकी, त्रिदल सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष चिखली संजय इंगळे, शिवराम निकम, श्रीमती महाले आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Previous Post Next Post