आ.सौ.श्वेता महाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण...
चिखली(महेश गोंधणे):- : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिखली शहरातील अशोक वाटिका येथे उभारलेल्या पुतळ्यास आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यासही पुष्प अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली.
“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला स्वाभिमानाचा व न्यायाचा मार्गच प्रत्येक भारतीयाचे भवितव्य घडवतो. समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये भारतीय लोकशाहीची पायाभरणी असून त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.”तसेच
“बाबासाहेबांच्या विचारांसाठी जगण्याचा आणि वंचितांपर्यंत संवैधानिक हक्क पोहोचवण्याचा संकल्प आज नव्याने करूया.सामाजिक एकजूट आणि समानतेचा मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे, त्यावर ठामपणे चालणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी महामानवांच्या स्मृतीस अभिवादन केले...