चिखली शहरातील प्रतिष्ठित उद्योजक आणि सामाजिकदृष्ट्या कार्यरत असलेल्या वाधवानी परिवारातील दीपक वाधवानी, विलास कंटुले,अमित वाधवाणी तसेच इतरांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे चिखली शहरातील व्यापारी व व्यावसायिक समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिखलीतील व्यापार,उद्योग आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये वाधवानी परिवाराचे घनिष्ठ संबंध असून,शहराच्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.श्वेता महाले यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून वाधवानी परिवाराने भारतीय जनता पक्षाची सदस्यता स्वीकारली.चिखली शहरात मागील काही वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा वेग, लोकाभिमुख उपक्रम आणि पारदर्शक कारभारामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस आणि परिणामकारक विकासदृष्टिकोनाचा उल्लेख करत,चिखलीच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार असल्याचे आ.सौ.श्वेता महाले यांनी सांगितले.
वाधवानी परिवाराचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणे म्हणजे चिखली शहराच्या व्यापारी व उद्योजक वर्गाचे समर्थन अधिक दृढ होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे मानले जात आहे.आ. सौ.श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आगामी काळातील चिखली विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.