चिखली(महेश गोंधणे):-नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज चिखली नगरपरिषद जि. बुलढाणा सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ( महिला), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सर्वसाधारण, व नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती . आज ८ ऑक्टोबर रोजी चिखली नगरपरिषदेच्या २८ जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत नगरपरिषद सभागृहात काढण्यात आली. या सोडतीत अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी ५, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी ८ तर उर्वरित १५ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या ठेवल्या गेल्या आहेत.
सोडतीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या उपस्थितीत पार पडला.या वेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असून उद्या यादी जाहीर करण्यात येईल ,सदर सोडतीवर कोणाची हरकत असल्यास ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
प्रभागनिहाय आरक्षण खालील प्रमाणे...
प्रभाग क्र. १ : (अ) मा. प्रवर्ग (OBC), (ब) स.सा. महिला (Open)
प्रभाग क्र. २ : (अ) मा. प्रवर्ग (OBC), (ब) स.सा. महिला (Open)
प्रभाग क्र. ३ : (अ) अ.जाती महिला (SC), (ब) स.सा. (Open)
प्रभाग क्र. ४ : (अ) मा. प्रवर्ग (OBC), (ब) स.सा. महिला (Open)
प्रभाग क्र. ५ : (अ) मा. प्रवर्ग महिला (OBC), (ब) स.सा. (Open)
प्रभाग क्र. ६ : (अ) मा. प्रवर्ग (OBC), (ब) स.सा. महिला (Open)
प्रभाग क्र. ७ : (अ) मा. प्रवर्ग महिला (OBC), (ब) स.सा. (Open)
प्रभाग क्र. ८ : (अ) स.सा. महिला (Open), (ब) स.सा. (Open)
प्रभाग क्र. ९ : (अ) मा. प्रवर्ग महिला (OBC), (ब) स.सा. (Open)
प्रभाग क्र. १० : (अ) अ.जाती (SC), (ब) स.सा. महिला (Open)
प्रभाग क्र. ११ : (अ) मा. प्रवर्ग महिला (OBC), (ब) स.सा. (Open)
प्रभाग क्र. १२ : (अ) अ.जाती महिला (SC), (ब) स.सा. (Open)
प्रभाग क्र. १३ : (अ) अ.जाती (SC), (ब) स.सा. महिला (Open)
प्रभाग क्र. १४ : (अ) अ.जाती महिला (SC), (ब) स.सा. (Open)