जिल्ह्यातील ११ नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर...

वाढदिवस अभिष्टचिंतन विदर्भ वंदन न्युज!💐🎂

(जिमाका)बुलडाणा(महेश गोंधणे):-
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्द्वातील १२ नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही सोडत ८ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित नगर परिषदांच्या कार्यालयात पार पडणार आहे.या सोडतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जारी केलेल्या आवाहन प्रमाणे संबंधित न.प च्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले असून या प्रमाणे नगरपालिका प्रशासनाच्या विविध सभागृहात ही आरक्षण सोडत निघणार आहे, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार तसेच "महाराष्ट्र
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक (आरक्षण) आदेश २०२५ नुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रत्येक नगर परिषदेच्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येईल. बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा पालिकेत ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता व चिखलीत दुपारी ३ वाजता प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. सिंदखेड राजाचे एसडीओ संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑक्टोबर दुपारी ११.००, देऊळगाव राजात दुपारी ३.०० वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.




Previous Post Next Post