आमदार श्वेता महाले यांचा शासनस्तरावर पाठपुरावा फलद्रूप
(महेश गोंधणे):-एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण या बाबींचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने राज्यभरातील अंगणवाड्यांचे रूपांतर “आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये”करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार विधानसभा मतदारसंघातील एकूण ३१ अंगणवाड्यांचा दर्जा उन्नत करण्यात येत असून,त्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ देण्यात येणार आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील या ३१ अंगणवाड्यांमध्ये चिखली तालुक्यातील २१ आणि बुलढाणा तालुक्यातील १० अंगणवाड्यांचा समावेश आहे. प्रत्येक स्मार्ट अंगणवाडी किटची किंमत ₹१,६५,००० असून, या किटमध्ये आधुनिक शिक्षणसामग्री, आरोग्य व पोषण सुविधा, लहान मुलांच्या कौशल्यविकासासाठी आवश्यक साधने आणि तांत्रिक उपकरणांचा समावेश आहे.
या अंगणवाड्यांमधून मुलांना आनंददायी वातावरणात पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार दिला जाईल. तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्यविकास प्रशिक्षणही उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे अंगणवाडी केंद्रांचा दर्जा सुधारून सोयी-सुविधांमध्ये वाढ होणार असून ग्रामीण भागातील बालविकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हा निर्णय मंजूर करून घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे चिखली मतदारसंघातील बालकांना आधुनिक शैक्षणिक व पोषण सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या योजनेत समाविष्ट अंगणवाड्या असलेली गावे पुढीलप्रमाणे आहेत::--
मासरुळ, माळवंडी, जांब, धाड, पी. सराई, भडगाव, सावळी, किन्होळा, शिंदी हराळी, येवता, बेराळा खुर्द, हरणी, किन्ही सवडत, मोहदरी, मंगरूळ नवघरे, मोंढाळा, शेलसुर, जामठी, केळवद, वळती आणि सवणा, पळसखेड,रुईखेड, मासरूळ, चांडोळं,ढसाळवाडी
या योजनेमुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील बालकांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत गुणवत्ता वाढून “स्मार्ट अंगणवाडी”चा आदर्श ग्रामीण भागात निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.