शेतकऱ्यांना खते, बी बियाणे आणि निविष्ठाची कमतरता पडू देऊ नये... आ.सौ.श्वेता महाले

  चिखली(महेश गोंधणे):-  शेतकरी हा फक्त पोशिंदा नाही तर या राज्याचा,व देशाचा तो कणा असून तोच खरा राज्यकर्ता आहे त्यामुळे शेतकरी व शेतीशी संबंधित खते बी बियाणे व अन्य निविष्ठा यांची शेतकऱ्यांना कमतरता भासणार नाही याची जिल्हा कृषी अधीकारी व कृषी विभागाने नोंद घ्यावी.अशी सक्त सूचना आ.सौ.श्वेता महाले यांनी अधिकाऱ्यांना दिली.
धाड व बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये युरिया खताचा तुटवडा असल्याबाबत काही शेतकऱ्यांनी आ.सौ.श्वेता महाले यांच्याकडे फोन द्वारे तक्रार केली होती. सदर तक्रारीला अतिशय गांभीर्याने घेत आ.सौ.श्वेता महाले पाटील यांनी त्वरित जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क साधत तालुक्यातील धाड व चिखली परिसरातील युरिया खताच्या उपलब्धतेबद्दल संपूर्ण चौकशी केली व युरिया खताच्या बफर स्टॉक पैकी शेतकऱ्यांना आवश्यक युरियाचे कृषी केंद्रांना ताबडतोब वाटप करावे असे सूचित केले.
त्यानुसार जिल्हा कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी जि.प.बुलढाणा यांच्या आदेशाने ओवी एंटरप्राइजेस धाड,ऋषिकेश कृषी केंद्र धाड,सागर बीज भांडार धाड, कल्याणी ऍग्रो सेंटर पाडळी, बालाजी शेतकरी कृषी केंद्र चिखली,संदीप कृषी केंद्र चिखली,वैभव कृषी केंद्र मेरा खुर्द,तिरुपती कृषी केंद्र उदयनगर,साई कृषी सेवा केंद्र जांब,ओंकार ऍग्रो उदयनगर,सागर सीड्स अँड फर्टीलायझर्स चिखली या कृषी केंद्रावर १६५ मॅट्रिक टन म्हणजेच ३३०० बॅग युरिया खताची उपलब्धता करून देण्यात आली असून या ठिकाणावरून आवश्यक त्या शेतकरी बांधवांनी युरिया खताची खरेदी करावी असे आवाहन आ.सौ.श्वेता महाले यांनी केले आहे.
Previous Post Next Post