ना बोर्ड, ना होर्डिंग.... सेवा परमो धर्म: मुख्यमंत्री यांचा वाढदिवस भाजपा सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार..
त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा पूरक कामे करून चिखली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस पुढील पाच दिवस सेवा सप्ताह म्हणून भाजपा कडून साजरा करण्यात येणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी चिखली शहरातील प्र.क्र १०व बस स्थानक परिसरामध्ये चिखली शहर भाजपाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली.त्यानंतर आ.सौ.श्वेता महाले यांच्या हस्ते नगरपरिषद चिखली यांच्या वतीने संत सावता माळी भवन,दीनदयाळ अत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत नगरपरिषद,चिखली येथे "सेवा सप्ताह"आयोजन करण्यात आले होते त्याचे उदघाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांना उद्योग व्यवसाय व सरकारी योजनाचे सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प चे मुख्याधिकारी बिडगर यांनी केले.या कार्यक्रमामध्ये शहरातील विविध महिला बचत गटाला व रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना आणि PMFME अंतर्गत बचत गटांना,सोबत दिव्यांग व वैयक्तिक लाभार्थीनां यावेळी कर्जस्वरुपात निधी वितरण करण्यात आले.
सेवा सप्ताह निमित्त आयोजित निधी वितरणाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांकडून व्यवसायांची उभारणी करण्यात यावी तसेच बचत गटाच्या माध्यमातून एक उत्तम व्यवसायांचे मॉडेल उभारण्यात यावे असे आव्हान आ.श्वेताताई महाले यांनी बचत गटांना उद्देशून केले.
महाराष्ट्र मध्ये सध्या कुशल प्रशासक आणि कार्यक्षम प्रशासन असल्याने जनतेची अनेक कामे मार्गी लागत असल्याचे पाहून आनंद होत आहे.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा कोणताही गाजावाजा कुणीच करू नये त्यामुळे ना बोर्ड ना होर्डिंग तर फक्त सेवा परमोधर्म:हा वसा घेऊन देवेंद्रजी प्रशासन चालवत असल्याने महाराष्ट्र विकासाच्या दिशेने आगे कूच करत असल्याचे आ.सौ.श्वेता महाले म्हणाल्या.
त्याप्रसंगी सुरेश खबुतरे,रामदासभाऊ देवडे,शहर भाजपा अध्यक्ष सागर पुरोहित,पंडितराव देशमुख,सुहास शेटे,सुरेंद्र पांडे,शैलेश बाहेती,विजय नकवाल,श्रीरंग पितळे,दत्ता सुसर,योगेश झगडे,अरुण सोनूने, संजय अतार,आकाश चुनावाले,अमोल शेटे,ऍड संजय सदार व आ.श्वेताताई महाले यांचे स्वीय सहाय्यक सुरेश इंगळे पाटील, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.