चिखली(महेश गोंधणे):-बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रचार प्रसार आणि नवीन शिक्षक बांधवांना संघामध्ये सामील करून घेणे तसेच त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख माजी विभागीय कार्यवाह एमडी धनरे यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये दौऱ्याचे नियोजन केले होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील चिखली स्वर्गीय राजाभाऊ बोंद्रे नगरपरिषद हायस्कूल चिखली ,श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली ,तसेच बुलढाणा येथील एडेड हायस्कूल बुलढाणा व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुलढाणा अशा विविध शाळांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान संघाच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या व त्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. यावेळी बुलढाणा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून तो भ्रष्टाचार वेळीच खणून काढण्याची वेळ आली आहे असे एका शिक्षक बांधवांनी मत व्यक्त केले त्यावर संघाचे अध्यक्ष यांनी आपण शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता आपण आपले काम संघटनेच्या माध्यमातून करून घ्यावे असे आवाहन केले दौऱ्या दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन विमाशी संघाचे जिल्हा सहकार्यवाह गजानन हिवरकर यांच्या थकीत बिल तसेच पेन्शन केस च्या संदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून त्यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी असे सांगितले दौऱ्या दरम्यान त्यांच्यासोबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू अवचार माजी प्रांतिक उपाध्यक्ष राम बारोटे जिल्हा कार्यवाहक सतीश शेळके जिल्हा सहकार्यवाह गजानन हिवरकर यांची उपस्थिती होती शाळा भेटी दरम्यान प्रत्येक शाळांमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले व आम्ही सुद्धा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे मत व्यक्त केले.
वि मा शी संघाच्या प्रांतीय अध्यक्षांचा बुलढाणा जिल्हा दौरा संपन्न.
byVidarbha vandan
-