7 मे रोजी होणारी मॉकड्रिल बुलढाणा जिल्ह्यात होणार नाही


पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि भारतीय सेना यांच्या दृढ संकल्पनेने काही तरी मोठ होणार ये निश्चित आहे.
 पण युद्ध केव्हा आणि कुठल्या बाजूने सुरू होणार हे सांगता येणार नाहीं. अर्थात संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाला युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार केले जातआहे.त्याचाच भाग म्हणून देशभरात उद्या, 7 मे रोजी मॉक ड्रिल होत आहे. राज्यात 16जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल होणार  असून बुलढाणा जिल्ह्या मॉकड्रिल मध्ये समाविष्ट नाही. परंतु बुलढाणा जिल्हा प्रशासनानेआज जिल्हाधिका कार्यालयाच्या दालनात आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेवून मॉकड्रिल संदर्भातआढावा घेतला,आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांनी कशा प्रकारे तय्यार राहावे, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातअसल्याची माहिती देण्यात आली. तीन सत्रांमध्ये ही मॉकड्रिल राबवण्यात येणार असून, यामध्ये सायरन तपासणी, नागरिकांचे स्थलांतर, बचाव कार्य आदी प्रात्यक्षिकं घेतली जाणार आहेत. आज दुपारच्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीं निर्माण झाल्यास नागरिकांनी कशा प्रकारे
वागावे, यासाठी मार्गर्शक सूचना तयार केल्या जात आहे या मध्ये औषधींचा साठा,उपलब्ध वैदयकीय सुविधा, रक्तसाठा  याची माहिती घेण्यात आली. विविध विभागाचे प्रमुख यावेळीउपस्थित होते.महाराष्ट्रात  मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक,रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर,  पिंपरी-चिंचवड, भुसावळ औरंगाबाद, , रायगड, सिंधुदुर्ग,रत्नागिरी,
 या शहरांमध्य मॉकड्रिल होणार आहे.
प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर देण्यात आल्या असे समजते.पालकमंत्र्या सह सर्व मंत्र्यांनी प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले. मॉकड्रिल च्या पाश्वभूमीवर राज्यातआपत्ती व्यवस्थापनच्या विभागाची बैठक घेण्यात आली.आपत्ती व्यवस्थापन
विभागाचे संचालक सतीश खडके यांच्या उपस्थितीत
या बैठकीला सुरवात झाली आहे. राज्यातील सर्व
महापालिकेचे आयुक्त आणि प्रमुख अधिका-यां सोबत व्हीसी द्वारे या बैठकीला सुरवात झाली आहे.सायरन वाजल्यावर काय करालं?
तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जाल.
5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा, सायरन वाजल्यानतर घाबरुन जायचे नाही.
मोकळ्या जागेपासून लांब रहा. घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा."टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या,अफवांवर विश्वास ठेऊ नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.सायरन हे सरकारी भवन,प्रशासनिक भवन,पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, सैन्य ठिकाणं,शहरातील मोठे बाजार, गर्दीच्या जागी वाजणार आहे.मॉकड्रिल मधे जिल्हाधिकारी ,स्थानीय प्रशासन,पोलीस,सिविल डिफेंस वार्डन, होम गार्डस, कॉलेज-स्कूल विद्यार्थी,एन सी सीचे विद्यार्थी,एन एस एस विद्यार्थी,नेहरू युवा केंद्राचे सेवाकर्मी यांचा मॉकड्रिल मधे समावेश असेल.
Previous Post Next Post