नांदूर मधम्येश्वर हा कालवा नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणांनी चर्चेत राहीला आहे. याच नांदूर मधमेश्वर कालव्यांची प्रशासकीय अधिकार्यांसोबत वितरिकांची सद्यस्थिती काय ? हा प्रश्न कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या मनात कायम होता.
म्हणून त्यांनी पुढिल योजना आखली आणि कर्तव्यपरायणताही दर्शविली.
वैजापूर,गंगापूर मतदारंघातील थेट नांदूर मधमेश्वर कालव्यांतून प्रवाहीत होणाऱ्या वितरिका क्रमांक 4, 5, 6 अ, 6 ब व क्रमांक 7 यांची पाहणी आमदार प्रा रमेश बोरनारे यांनी संबंधित अधिकार्यांसोबत केली. यावेळी उपस्थित शेतकर्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व लगेच त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
.
तसेच शेतचाऱ्यांची जागोजागी झालेली तुटफुट, काही चाऱ्यामध्ये वाढलेली झाडी झुडपे व साचलेला गाळ काढणे, तसेच अतिक्रमणामुळे बुजलेल्या चाऱ्या, कालव्याच्या खोलगट भागात मोठ्या प्रमाणावर जमा झालेला गाळ यामुळे शेवटच्या टोकाच्या शेतात पाणी पोहचत नसल्याने त्या पासुन अनेक शेतकरी वंचित होते., ती देखील दुरुस्ती करण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली यावेळी आमदार प्रा बोरनारे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते त्या दुरूस्ती कामांसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला. आणि त्या कामांचा शुभारंभ आमदार प्रा रमेश बोरनारेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
.
प्रत्येक वितरिकेवर ‘टेल टू हेड’ सिंचनाचे नियोजन करण्यासाठी पाणी वाटप संस्थांचे सक्षमीकरण करून जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी पाणी मागणी अर्ज भरून पाण्याची मागणी करावी अशा सुचना ही दिल्या., जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे 11 टीएमसी पाणी मिळेल. असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना आमदारांनी केले.
.
यावेळी सलग दुसर्यांदा विधानसभेचे सदस्य व शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित गावकऱ्यांनी आमदार प्रा.बोरनारे यांचा सत्कार करत अभिनंदन केले व मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल आमदारांनी देखील उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
.
याबैठकीस मा. नगराध्यक्ष साबेरभाई, कार्यकारी अभियंता श्री गुजरे, कालवा सल्लागार समिती सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पा साळुंके, माजी सभापती अंकुश पा हिंगे, शहरप्रमुख पारस घाटे, संचालक कल्याण पा जगताप, प्रशांत त्रिभुवन, उपकार्यकारी अभियंता सचिन ससाणे व सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व ना.म.का लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
