वैजापूर : गेल्या वर्षभरापासून तालुक्यात 'मनरेगा'च्या नव्या कामांना अडथळ्यावर अडथळे सुरु आहे. आता मंजूर असलेल्या नव्या सार्वजनिक कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. जुनी कामे अपूर्ण असताना नवी कामे हाती घेतल्यामुळे पुढील वर्षाचे लेबर बजेट मंजूर करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने जुनीच कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा आदेश दिले आहेत. परिणामी, नवी कामे सुरू करण्यासाठी पुन्हा वाट पाहावी लागणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे हाती घेतली जातात. यामध्ये पाणंद रस्ता, काँक्रिट रस्ता, घरकुल, शौचालय, सिंचन विहीर, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, रेशीम उद्योग, बांबू लागवड आदी कामांचा समावेश आहे. पाणंद
रस्ता व काँक्रिट रस्त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून, तर अन्य कामांसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होतो. ही कामे ४० टक्के कुशल व ६० टक्के अकुशल मनुष्यबळाचा वापर करून करावी लागतात. दरम्यान, मनरेगांतर्गत जुनी कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत. जुनी कामे अपूर्ण असताना नवीन कामे सुरू केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढील वर्षीचे म्हणजेच २०२५-२६ चे लेबर बजेट मंजूर करण्यास अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा धोका टाळण्यासाठी जुनी कामे
आचारसंहिता, पावसाळा आणि आता...
वैजापूर, पंचायत समितीत प्रशासकराजमुळे अघोदरच कामांची घडी विस्कटलेली, त्यात नेत्यांच्या मर्जीनुसार चालनारा अधिकारी 'खुर्ची'वर पाहिजे यासाठी तब्बल चार ते पाच प्रभारी 'बीडीओ'च्या वर्षभरापासून सुरु असलेल्या संगीत खुर्चीमुळे 'मनरेगा'च्या कामाना लागलेली घरघर त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. आचारसंहितेत नवी कामे सुरू करणे अडचणीचे होते. त्यानंतर पावसाळ्यामुळे कामे ठप्प झाली. पाठोपाठ विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे नवी कामे पुन्हा थांबली. आता आयुक्तांच्या आदेशामुळे पुन्हा एकदा नव्या सार्वजनिक कामांना ब्रेक लागला आहे. याविषयी गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांना विचारले असता, शासनाच्या उपरोक्त पत्रात नमूद आदेश पूर्ण राज्यात लागू असल्याचे सांगितले.
प्राधान्याने पूर्ण करावीत. त्यानंतरच नवी कामे सुरू करण्याचे आदेश मनरेगाच्या आयुक्तांनी दिले आहेत. वास्तविक अपूर्ण असणारी जुनी कामे तीन वर्षांतील आहेत. विविध कारणांनी ती पूर्णत्वाला जाऊ शकलेली नाहीत; पण त्याचा फटका नव्या कामांना बसला आहे. पाणंद
रस्ता, काँक्रिट रस्ता, सिंचन विहिरीसारखी कामे आताच सुरू करणे आवश्यक असते. पावसाळ्यात ही कामे करता येत नाहीत. विविध कारणांनी सात-आठ महिन्यांपासून प्रतीक्षा केल्यानंतर आता नव्या आदेशामुळे पुन्हा प्रतीक्षाच पदरी आली आहे.
