आर्ट ऑफ लिविंग द्वारे आयोजित "किसान समृद्धी महोत्सव 3.0" कार्यक्रमास आ.श्वेताताई महाले यांचे संभोधन

आर्ट ऑफ लिविंग द्वारे आयोजित "किसान समृद्धी महोत्सव 3.0" कार्यक्रमास आ.श्वेताताई महाले यांचे संभोधन

 जलसंधारणातून समृद्धी महाराष्ट्राची!



आर्ट ऑफ लिविंग द्वारे आयोजित "किसान समृद्धी महोत्सव 3.0" कार्यक्रमास संस्थापक मा. श्री श्री रवी शंकर जी यांच्यासह उपस्थित राहून जलसंधारण व त्याचे महत्व याविषयी आपले मत मांडले.


राज्याचे कार्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार 2 मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत सामंजस्य करण्यात आला आहे. तसेच कृषी विभागासोबत नैसर्गिक शेतीच्या कामासाठी करार केला असून या कराराद्वारे 24 जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशासनासोबत समन्वयाने काम करत आहे.


या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत.


या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये सन 2024 मध्ये जलसंधारण विभागामार्फत व्यक्ती विकास केंद्र भारत आर्ट ऑफ लिविंग यांना गाळ काढण्यासाठी चिखली मतदारसंघातील कवळा, तेल्हारा ,पाटोदा, हराळखेड आणि पळसखेड येथील गाव व पाझर तलावातील गाळ काढण्याची कामे देण्यात आली होती. यामध्ये 151,304 म्हणजेच 1 लक्ष 51 हजार 304 घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे 1 हजार 513.1 लाख लीटर पाणी साठवण क्षमता वाढली आहे.


काढलेल्या गाळामुळे आजूबाजूची शेती सुपीक होउन शेती उत्पादन वाढले आहे. तसेच चिखली विधानसभा मतदारसंघासोबतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अजून बरीचशी जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. यामध्ये नाला खोलीकरणाची कामे पाझरतला व साठवण तलाव दत्तक घेऊन त्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स करणे सिमेंट नाला बांध बांधणे सिमेंट साठवण बंधारे द्वारयुक्त बंधारे यातून गाळ काढणे व लोकांमध्ये जलसंधारणा बाबत जनजागृती करणे कॅनल सिस्टीम ची रिपेरिंग ची विविध कामे व पाण्याचे नियोजन शेतकऱ्यांना करून देणे अशा प्रकारची अनेक कामे अजूनही करणे शिल्लक असल्याने आर्ट ऑफ लिविंग ने याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.



Previous Post Next Post