चाकुचा धाक दाखवुन पैसे लुटणारे अट्टल गुन्हेगार चिखली पोलीसांकडून अटक ; आरोपींची बुलडाणा कारागृहात रवानगी.



 

चाकुचा धाक दाखवुन पैसे लुटणारे अट्टल गुन्हेगार चिखली पोलीसांकडून अटक ; आरोपींची बुलडाणा कारागृहात रवानगी.



चिखली (विदर्भ वंदन न्युज चिखली):-पोलीस स्टेशन चिखली येथे फिर्यादी सुनिल सखारामअप्पा जिरवनकर वय ५३ वर्ष, हॉटेल राज वाईन बार मालक रा. गांधीनगर चिखली यांनी तक्रार दिली की, दिनांक ०३.०१.२०२५ रोजी रात्री ०८:३० वाजताचे सुमारास ते राज वाईन बार हॉटेलचे काऊंटरवर बसलेले असतांना आरोपी से. समिर से. जहीर व विशाल राजेश दांडगे ऊर्फ डुबल्या दोन्ही रा. गौरक्षणवाडो चिखली असे हातात चाकु घेऊन हॉटेलमध्ये घुसले व आरोपी सै. समीर याने फिर्यादीच्या गळ्याला चाकु लाऊन आरडा ओरड करशील तर चाकु खुपसून चाकु देईल अशी धमकी देऊन गल्ल्याजवळ घेऊन गेला व गल्ल्यातील ११००/- रु. जबरीने काढून घेतले तसेच आरोपी विशाल याने फिर्यादीच्या खिशात हात घालुन खिशातील पैसे ९००/- रुपये जबरीने काढुन घेतले व पोलीसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन तेथुन पळून गेले. सदरची तक्रार प्राप्त होताच नमुद दोन्ही आरोपी विरुध्द गु. र. नं. ०६/२०२५ कलम ३०९ (४), ३५१ (२), ३ (५) बिनस प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास




नमुद आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने व त्यांची दहशत वाढत असल्याने त्यांना अटक करणे आवश्यक असल्याने चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी तपास पथक तयार करुन आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यात अटक करण्याच्या सुचना दिल्या, नमुद तपास पथकाने आज दि. ०१.०१.२०२५ रोजी आरोपीवावत माहीती काढली असता ते गोरक्षणवाडी येथे लपुन असल्याची माहीती मिळाली, सदर माहीतीवरुन पथकाने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक केले असुन त्याच्याकडुन गुन्ह्यात वापरलेला चाकु व जबरीने चोरुन नेलेले २०००/- रु. जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींना मा. न्यायालया समोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींची बुलडाणा जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.


सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मा. अपर पोलीस अधीक्षक वि. बी. महागुणी, गा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात पोउपनि परमेश्वर केंद्रे, शरद भागवतकर, प्र. पोउपनि समधान वडणे, संतोष जाधव, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, प्रशांत धंदर, पंढरी मिसाळ विजय किटे, अमोल गवई, गजानन काकड, सागर कोल्हे, निलेश सावळे यांनी केली आहे.



Previous Post Next Post