डॉ.निवृत्ती विठ्ठलरावराजे जाधव यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कार जाहीर...

(महेश गोंधणे) :-चिखली वार्ता दैनिक भारत संग्राम आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व काल कथित मधुकरराव खंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ व समाज भूषण अर्जुनराव गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये  संजिवनी बहु शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि बुलढाणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्तीराजे जाधव सर्जनशील व्यक्तिमत्त्व यांना संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत स्वीकारले इतरांना जागृत केले. गोपाला गोपाला पुकारले आज ही गजर निवांत आहे मानवता हीच जगी श्रेष्ठ असते साऱ्या जगाला सांगतो आहे. उत्सव यशाचा सन्मान कर्तुत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ साखरखेर्डा ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा यांच्या वतीने मुख्य आयोजक सचिन खंडारे पत्रकार व कैलासभाई  सुखदाने , भाई वानखेडे, उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे , सचिन अंबादास काटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अध्यक्ष अस्तित्व फाउंडेशन व सरपंच साखरखेर्डा दाऊद कुरेशी,प्रवीण गीते,पत्रकार प्रताप मोरे जिल्हाध्यक्ष अ.भा पत्रकार संघ बुलढाणा, माजी केंद्रप्रमुख दिलीपराव खंडारे,अनिल तुपकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , अर्जुनराव गवळी समाजभूषण तथा अनिकेत सैनिकी स्कूल ,कवी रामदास कोरडे, साखरखेर्डा येथील ठाणेदार ,इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . 
संत गाडगेबाबांनी स्वतःसाठी काही न करता इतरांसाठी मोठे काम केले आहे. डॉ निवृत्ती विठ्ठलराव राजे जाधव गेल्या अनेक वर्षांपासून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवराय यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत भारतीय संविधानिक विचार मूल्य जर्मन सात रुचवण्याचे काम करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो परंतु सामाजिक उपेक्षित घटकांना काहीतरी देणे आहे म्हणून यांनी सामाजिक कार्यातून लोकांना मदत, जनजागृती करिता कार्य, आणि याच कार्याची दाखल म्हणून डॉक्टर निवृत्ती जाधव यांना सामाजिक कार्यातील भरीव योगदान बदल संत गाडगेबाबा समाजातनं पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 
Previous Post Next Post