छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी..


चिखलीत भाजप युवा मोर्चाचे पोलीस ठाण्यात निवेदन..
(महेश गोंधणे):-चिखली : संपूर्ण भारतवर्षाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊ यांच्याविषयी सोशल मीडियावर अतिशय आक्षेपार्ह,अपमानजनक व गलिच्छ लिखाण केल्याची गंभीर घटना चिखली शहरात उघडकीस आली आहे. मलिक अशपाक नावाच्या एका व्यक्तीसह त्याच्या काही साथीदारांनी इंस्टाग्रामवरून हे लिखाण प्रसिद्ध करून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा तसेच समस्त हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे शहरासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून,दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना धडा शिकवावा,अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. 
या अनुषंगाने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय वाळेकर यांनी पोलीस ठाण्यात अधिकृत निवेदन सादर केले.
निवेदनात संबंधित आरोपी व त्याच्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या सर्व साथीदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहरातील विविध पक्षांतील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी एकमुखाने छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊ यांच्याविषयी कोणतीही अपमानास्पद भाषा खपवून घेतली जाणार नाही,अशी भूमिका मांडत कायद्याने कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
Previous Post Next Post