आ.श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारातून सानुग्रह अनुदानाचे वाटप...
(महेश गोंधणे):-भरोसा येथील शेतकरी स्व.गणेश श्रीराम थुट्टे व त्यांच्या पत्नी स्व.रंजना गणेश थुट्टे यांनी शेतातील आर्थिक अडचणींमुळे दुर्दैवाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले होते.अशावेळी शेतकऱ्यांवर ओढावलेल्या कठीण परिस्थितीत भाजपा महायुती सरकार शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचे सांगून आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी या कुटुंबाला सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून संबंधिताना सूचना दिल्या होत्या परिणामी राज्यशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत चिखली विधानसभा मतदारसंघातील भरोसा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आज आ.सौ.श्वेता महाले यांच्या हस्ते रु. एक लक्ष एवढे सानुग्रह अनुदान देण्यात आले.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी या शेतकरी दांपत्याच्या वारसांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.या प्रयत्नांना यश येत, स्व.गणेश थुट्टे यांचे वारस श्री.नागेश थुट्टे यांना शासनाकडून ₹१,००,००० (एक लाख रुपये) इतक्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश आ. सौ.श्वेता महाले यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
हे अनुदान केवळ आर्थिक मदत नसून, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या आयुष्यात पुन्हा आशा, आधार आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शेतकरी हितासाठी संवेदनशील धोरणे राबवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी असून, संकटात सापडलेल्या कुटुंबियांना न्याय, दिलासा व आधार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आ.सौ.श्वेताताई म्हणाल्या.
आ.श्वेता महाले यांच्या तत्पर व संवेदनशील भूमिकेमुळे भरोसा येथील शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मदतीचा हात मिळाला असून, महायुती सरकार शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे...