(महेश गोंधणे):-ज्याअर्थी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २३ मध्ये" कोणत्याही व्यक्तीने एखाद्या प्रभागामध्ये ज्या तारखेस किंवा तारखांस त्याप्रभागातील एखाद्या निवडणुकीकरीता मतदान घेण्यात येईल, त्या तारखेस किंवा तारखांस कोणतीही जाहिर सभा बोलाविता, भरविता किंवा तीस हजर राहता कामा नये" अशी तरतूद आहे
आणि ज्याअर्थी उपरोक्त अधिनियमातील तरतूदीच्या अनुषंगाने निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसार माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५ दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ मधील भाग ८ अनुक्रमांक १६ (३) (ख) मध्ये, "नगरपरिषद / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक / पोटनिवडणुकांबाबत, मतदान सुरु होण्याच्या दिनांकास निर्बंध असतील, उदा. १० तारखेस मतदान असल्यास ९ तारखेला रात्री १२.०० वाजता प्रचारासोबत जाहिरात प्रसिध्दी / प्रसारणदेखील बंद होईल मात्र ९ तारखेला रात्री १०.०० नंतर प्रचलित अधिनियम / नियमानुसार सभा/ प्रचार फेऱ्या/ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही" अशी तरतूद आहे
आणि ज्याअर्थी आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ मध्ये मुद्दा क्रमांक ६ मधील २ मध्ये नमूद "मतदान सुरु होण्याच्या दिनांकापुर्वी २४ तास अगोदर म्हणजेच १० तारखेस मतदान सुरु होत असल्यास ८ तारखेला रात्री १२.०० वाजता प्रचार बंद होईल मात्र ८ तारखेला रात्री १०.०० नंतर सभा/ मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधीत जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण देखील बंद होईल, तसेच संदर्भ क्रमांक ४ वर नमूद "वारवार विचारले जाणारे प्रश्न २०२५ मध्ये देखील अशाच आशयाचे उत्तर नमूद करण्यात आले आहे
आहे आणि ज्याअर्थी अधिनियमाच्या तरतूदीशी सुसंगत तरतूद सर्व आदेशांमध्ये असणे आवश्यक
त्याअर्थी वरील परिच्छेद ३ मधील आचारसंहितेबाबत तरतूद (दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ च्या एकत्रित आदेशातील मुद्दा क्रमांक ६ मधील २) खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे
"मतदान सुरु होण्याच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच ०२ तारखेस मतदान सुरु होत असल्यास १ तारखेला रात्री १०.०० वाजता प्रचार बंद होईल. त्या वेळेपासुन सभा/ मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधीत जाहिरात प्रसिध्दी/ प्रसारण देखील बंद होईल"
वरील आदेशाची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी, तसेच याअनुषंगाने संदर्भिय सर्व आदेशांमध्ये सदरची सुधारित तरतूद लागू राहील
राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार पत्र प्रसिद्धी साठी देण्यात आले आहे.