चिखली (महेश गोंधणे):–दोन दिवसा पूर्वी झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख पटली बुलढाणा अर्बन बँकेत कार्यरत असलेले डोंगर खंडाळा येथील रहिवासी विजय गिरी (वय ४५) हे दि. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी मोटरसायकलने जात असताना चिखली ते अमडापुर रोडवरील महादेव मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन त्यामध्ये त्यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
डोंगर खंडाळा येथील रहिवासी व बुलढाणा अर्बन बँकेच्या मुख्य शाखेत कार्यरत कर्मचारी विजय ओंकार गिरी यांचा अमडापूर -चिखली मार्गावर असलेल्या महादेव मंदिराजवळ भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. विजय गिरी हे (एम एच २९- ऐ ऐ ६०९४ ) क्रमांकाच्या दुचाकीने जातअसतानाअमडापूर जवळील महादेव मंदिराजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली. त्यात विजय गिरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. ही माहिती अमडापूर पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठवीला. या घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस स्टेशन करीत आहेत. मृतक विजय गिरी यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.