आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चिखली येथे अभिष्टचिंतन आणि कन्या पूजन सोहळा संपन्न...


चिखली:-आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चिखली येथे आज विद्यार्थ्यांचे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.भारतीय संस्कृतीनुसार होम हवन आणि मंत्रोच्चारांच्या निनादांमध्ये विद्यार्थ्यांचे जन्मदिवस साजरे करण्यात आले. सद्यस्थिती सुरू असलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीचे अतिक्रमण पाहता विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी नाळ जुळली असावी याकरिता असे अनेक उपक्रम क्रमप्राप्त ठरतात. आपल्या आदर्श शाळेमध्ये नेहमीच संस्कृतिक मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतात त्यापैकीच विद्यार्थ्यांचे अभिष्टचिंतन सोहळा हा एक उपक्रम आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रम प्रमुख वाघ सर यांनी केले. त्याचप्रमाणे पौराहित्य जोशी बुवा यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका सौ.लोणकर मॅडम उपस्थित होत्या. त्यासोबतच कन्या पूजनाचा कार्यक्रम सुद्धा शाळेमध्ये घेण्यात आला सौ.नानीताई लोणकर मॅडम यांनी कन्या पूजनाचे महत्त्व सांगितले. भारतीय संस्कृतीमध्ये कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. पालकांच्या हस्ते कन्येचे पूजन आणि औक्षण करण्यात आले.आभार प्रदर्शन सौ. दिवटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post