देशाच्या लोकशाहीचे खरे रक्षक आणीबाणी काळातील सेनानी... आ.सौ.श्वेता महाले

चिखली:-कव्हळा येथे लोकतंत्र सेनानी संमेलन संपन्न...
स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणीबाणीतील लोकशाही योद्ध्यांच्या सन्मानार्थ “लोकतंत्र सेनानी संमेलन - 2025” हा भव्य कार्यक्रम श्री महादेव मंदिर संस्थान, कव्हळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आ.सौ.श्वेता महाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून आणीबाणीतील सेनानींच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले.
आपल्या प्रेरणादायी विचारात आ.श्वेताताईंनी सांगितले
"आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ज्येष्ठ सेनानींनी दाखवलेले धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहेत.1975 मध्ये काँग्रेसने लोकशाही गळचेपी केली, तेव्हा या सेनानींनी भीती न बाळगता सत्य,न्याय आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी लढा दिला. त्यांचा हा संघर्ष देशातील प्रत्येक नागरिकाने स्मरणात ठेवावा.”
आपल्या भाषणात त्यां म्हणाल्या की 
आणीबाणीस ५० वर्षे पूर्ण होत असताना आपण पुन्हा एकदा लोकशाहीच्या मुल्यांना दृढ करायचे आहे.जनतेचा आवाज हीच खरी ताकद आहे,आणि ती ताकद सदैव संविधानाच्या चौकटीतूनच प्रकट व्हावी.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुंडलिक महाले यांनी भूषवले होते.तसेच कार्यक्रमास विद्याधर महाले (खाजगी सचिव,मुख्यमंत्री,महाराष्ट्र ) सौ.गंगाताई गवळी,महेंद्र गवळी,सुधीर चांडगे,एकनाथ जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप)अमोल साठे (तालुका अध्यक्ष, भाजप) किरण सरोदे,सुधीर तांबट,प्रल्हाद भुतेकर,डॉ.तेजराव नरवाडे,विजय खरात,प्रशांत पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या लोकशाही सेनानींचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या भावनिक सोहळ्यात उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत त्या काळाच्या आठवणी जागृत झाल्या.
Previous Post Next Post