चिखली(महेश गोंधणे):- एक वाढदिवस साजरा झाला तो समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा,वरदडा येथील चिमुकल्यांबरोबर तीथे काही वेळ घालवता आला याचं खूप मोठं समाधान मनाला मिळालं. कारण तिथे त्यांचं दुःख काय आहे हे मला जवळून बघता आलं अस मनोगत व्यक्त केलं ते श्री विद्याधर जी महाले खाजगी सचिव,देवेंद्रजी फडवणीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व चिखलीच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या सानिध्यात व तालमीत असलेल्या विष्णू आव्हळे याचे "आश्रम शाळा" ही फासेपारधी समाजातील जिल्हाभरातील अनाथ, निराधार, निराश्रित,बेसहारा मुलांचं हक्काचं घर आहे.
या सर्व चिमुकल्यांचा सांभाळ करण्यासाठी युवराज पवार सर सारखा देवरुपी माणूस मिळाला, आणि ते हा प्रकल्प अतिशय ताकदीने चालवत असून ते प्रकल्पावरील ७५ पेक्षा जास्त मुलांचे मायबाप झाले आहेत. त्या सर्वांचे ते अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने मायेची झालर लावून सांभाळ करत आहेत.हे सर्व मुलं आहेत फासेपारधी समाजातील ते आतापर्यंत कधीच शाळेची घंटा ऐकत नव्हते, कारण त्यांच्या जगण्यात ती कधीच वाजलेली नव्हती. त्यांच्या हातात पुस्तक नव्हते, कारण आयुष्याच्या पानांवरच संघर्ष लिहिलेला होता. पारधी समाजातील ही निष्पाप मुलं शिकू पाहतात, आज त्यांच्यासोबत उभं राहण्याची वेळ आहे. त्यांना हात देण्याची, नशिब बदलण्याची, त्यांच्या डोळ्यांतील चमक शिक्षणाच्या प्रकाशात परावर्तित करण्याची.
ही मुलं चुकली नाहीत, फक्त त्यांच्या वाटेला शाळा आली नाही. नशीबाच्या नावाखाली त्यांचं बालपण अंधारात हरवलंय. शिकायचं त्यांनाही आहे, शिकलेली बोटं पुस्तकं धरतात,ही मुलं मात्र भुकेचे आणि उपेक्षेचे ओझं उचलतात. आज एक हात पुढं केला तर उद्या त्यांच्या हातात पेन असेल. आज त्यांना साथ दिली, तर उद्या तेही शिक्षक, डॉक्टर, पोलीस अधिकारी होतील.
आज समाज म्हणून आपल्या संवेदना जाग्या ठेवण्याची वेळ आहे.
चरणजीत सारख्या मुलाला DYSP बनून समाजाला लागलेला कलंक पुसायचा आहे. इथल्या प्रत्येकाला समाजासाठी काही तरी करायचं यासाठी ची पवार सरांची धडपड वाखानण्या सारखी आहे.विष्णू ने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना थोडीशी मदत व्हावी आणि आयुष्यचं ओझं कमी व्हावं हा प्रामाणिक उद्देश समोर ठेऊन या सर्व मुलांना स्कूल बॅग देऊन एक अनोखा वाढदिवस साजरा केला व आपल्या कर्तव्यपूर्ती ची जाण करुन दिली. या वेळी युवराज पवार सर, (पारधी अधिवासी आश्रम शाळा प्रकल्पाचे संचालक) रामेश्वर वसु (तालुका संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग बुलढाणा) कृष्णा सपकाळ (बुलडाणा लाईव्ह, जिल्हा प्रतिनिधी) विनोद वाघमारे (सामाजिक कार्यकर्ता) व ईतर मित्र परिवार उपस्थित होता.