नायगांव खुर्द शिवारात पेनटाकळी धरणाचे पाण्यात मिळुन आलेल्या महिलेचा खुन झाल्याचे पोलीस तपासात उघड.

(महेश गोंधणे):-अमडापुर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम नायगांव खुर्द येथील किशोर शामराव गायकवाड यांची पत्नी हि दिनांक- 29/06/2025 रोजी त्यांचे शेतातुन घरी जाण्यास निघालेली असतांना ती घरी पोहोचली नसल्याबाबत महिलेचा पतीने दिलेल्या रिपोर्ट वरून अमडापुर पोस्टेला मिसींग क्र.-0019/2025 दाखल प्रकरणांचा तपास अमडापुर पोलीस करित असतांना, सदर मिसींग मधिल महिला आशा किशोर गायकवाड, वय 27 वर्षे, रा. नायगांव खुर्द हिचे प्रेत नायगांव खुर्द शिवारातील पेनटाकळी धरणाचे पाण्यात मिळाल्याबाबत प्राप्त माहिती वरून पोलीसांनी सदर महिलेच्या प्रेतावर पंचनामा कारवाई करून वैदयकिय अधि.ग्रा.रू.चिखली यांचे कडुन पोस्टमार्टम करून घेतले.
प्रकरणी मयत महिलेला तिचा पती, सासरा, सासु व दिर असे माहेरून तिस हजार रूपये घेवुन येण्याचे कारणांवरून त्रास देत होते, त्यांचे त्रासाला कंटाळुन महिलेने आत्महत्या केली असल्याबाबत महिलेचा भाऊ फिर्यादी नितीन भिमराव अवसरमोल, रा. नांद्रा धांडे यांनी पोस्टेला दिलेल्या रिपोर्ट वरून आरोपी नामे किशोर शामराव गायकवाड (पती), शामराव मारोती गायकवाड (सासरा), सखुबाई शामराव गायकवाड (सासु) व मधुकर शामराव गायकवाड (दिर) सर्व रा. नायगांव खुर्द यांचे विरूध्द अमडापुर पोलीस स्टेशनला कलम 108, 85, 3(5) भा.न्या.सं. 2023 नुसार गुन्हा दाखल झाला.
सदर गुन्हयात पोलीस अधिक्षक  निलेश तांबे,अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील,पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर,स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांचे मार्गदर्शनात पो. स्टे अमडापुरचे ठाणेदार निखिल निर्मळ सोबत पोहेकों भगवान शेवाळे,पोकों चंद्रशेखर मुरडकर यांनी सुरू केला.तपासादरम्यान पोलीसांनी मा. वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात कौशल्यपूर्वक रितीने आरोपीतांना विचारपूस करीत असतांना, गुन्हयातील आरोपी मधुकर शामराव गायकवाड (मृत महिलेचा दिर) याने पोलीसांना सांगीतले की, मागील अंदाजे तिन वर्षापासुन त्याचे मृतक महिलेसांवत प्रेम संबंध होते. तो महिलेला वारंवार मोटार सायकलवर बसवुन बाहेर जात होता. सदरी महिला हि त्याला तू माझ्याशी लग्न कर अशी वारंवार मागणी करीत असल्याने एके दिवशी त्यांनी दोघांनीही मोळा-मोळी येथील मंदिरावर जावून आरोपीने महिलेला कुंकू लावुन लग्न केल्याचा बनाव केला होता. तसेच महिलेच्या मागणीनुसार महिलेचे जुने मंगळसूत्र तोडुन त्याने स्वतःचे नावांने मंगळसुत्र तयार करून महिलेच्या गळयात सुध्दा घातलेले होते. परंतु सदर महिलेची सततची पैशांची वाढत चाललेल्या मागणीला आरोपी मधुकर त्रासुन गेला होता, त्यामुळे मागील दोन महिन्यापासुनच महिलेचा खून करून एकदाची कटकट संपविण्याची युक्ती आरोपीचे डोक्यात सुरू झाली.
घटनेच्या दिवशी दिनांक- 29/06/2025 रोजी सकाळी महिलेचा पती, महिला व आरोपी असे शेतात पेरलेले सोयाबिनचे पिक निघाले किंवा नाही ते पाहण्याकरीता शेतात गेलेले होते. दुपारच्या 01.30 वाजताचे सुमारांस महीलेचा पती शेतात बक-या चारत असतांना, महिलेने त्यांना हाताने ईशारा करून मी घरी जात असल्याचे सांगीतले व घरी जाण्याकरीता निघाली. तिचे पाठोपाठ आरोपी मधुकर गायकवाड हा सुध्दा निघाला व रस्त्यात महिलेला गाठुन दोघेही त्यांचे गट नं.31 मधील शेताकडे आले, तेथे पेनटाकळी धरणाचे पाण्याचे जवळील एका दगडावर आरोपी बसलेला असतांना, महिलेला त्याने प्रेमाणे जवळ घेत विश्वासांने तिला दोन्ही हाताचे कवटीत धरून दोन्ही पायांनी तिचे पाय घटट दाबुन धरून आरोपीने सोबतच आणलेल्या दोरीने तिचा गळा आवळला व आत्ता मी तुला मारून टाकू काय ? असे गंमतीने म्हटल्यावर सदर महिलेने त्याला गंमतीनेच होकार दिला, परंतु आरोपी मधुकर याने त्याचे दोन्ही हाताने दोरी आवळुन सदर महिलेचा खुन केला,व महिलेचे प्रेत बाजुलाच असलेल्या धरणाच्या पाण्यात टाकुन ते कोणालाही दिसु नये म्हणुन प्रेतावर गाळ टाकुन पाण्यात खोलवर दाबुन दिले.तसेच महिलेची टिपीन डब्याची थैली,चप्पल व गळा आवळन्या करीता वापरलेली दोरी असे साहित्य आरोपीने धरणाचे पाण्यात टाकुन त्यावर दगड ठेवले असे आरोपीने पोलीसांना सांगीतले.
यावरून सदर गुन्हयातील आरोपी मधुकर शामराव गायकवाड यानेच मयत महिलेच्या सतत वाढणा-या मागणीला कंटाळुन तिचा दोरीने गळा आवळुन खुन केल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाल्याने पोलीसांनी गुन्हयात 103(1), 238(a)भा.न्या.सं.चे वाढ करून गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सखोलपणे व बारकाईने करीत आहेत.
Previous Post Next Post