येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत विषबाधा झालेल्या विद्यार्थीनीनां मिळाली सुट्टी.

बुलढाणा : तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची संतापजनक व धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली होती. रात्रीच्या जेवणानंतर तब्बल १३ विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्या. त्यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर होती, त्यांच्यावर बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष निगराणीखाली उपचार सुरू होते .
येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत कढी भात खाल्ल्यानंतर १३ विद्यार्थ्यांनींना उलटी-मळमळ व पोट दुखीचा त्रास होत असल्याची बातमी समोर आली होती.त्या विध्यार्थीनीनां  जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. शुक्रवारी ८ विद्यार्थिनींवर उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. आज सकाळी देखील ५ विद्यार्थिनींना उपचार करून सोडण्यात आले आहे.
Previous Post Next Post