गावाचे पुनर्वसन म्हणजे पुनर्जन्मच असतो. त्यामुळे ग्रामस्थांना कमीत कमी त्रास व्हावा आणि नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी मी कटिबद्ध.आ.श्वेताताई महाले


 पुनर्वसन म्हणजे पुनर्जन्म, घाणमोड, मानमोड व पांढरदेवला पुनर्वसनाची संजीवनी, नुकसान भरपाईचे धनादेश वाटप:-  गावाचे पुनर्वसन म्हणजे पुनर्जन्मच असतो. त्यामुळे ग्रामस्थांना कमीत कमी त्रास व्हावा आणि नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी  केलेल्या पाठपुराव्यास यश.आ. सौ श्वेताताई महाले यांचे प्रतिपादन आज मौजे घाणमोड, मानमोड व पांढरदेव (ता. चिखली) या गावांना पुनर्वसन नुकसान भरपाईचे धनादेश वाटप केले.
भूसंपादन अधिकारी, बुलढाणा यांच्याशी आ. श्वेताताई यांनी वारंवार चर्चा करून भू-संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा आग्रह ठेवला.त्यानुसार
: घाणमोड येथील 73 लाभार्थ्यांना 9 कोटी 91 लाख 60 हजार 685, 
: मानमोड येथील 107 लाभार्थ्यांना 13 कोटी 85 लाख, 
: पांढरदेव येथील 83 लाभार्थ्यांना 7कोटी 51 लाख 67 हजार 917 रुपये 
एवढी नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे.
अनेकदा पुनर्वसन हे सुखकारक नसते. यात बर्‍याचदा घर, शेती व व्यवसायाचे नुकसान होते, आर्थिक अडचणी येतात. स्थलांतर, विस्थापन व नातेसंबंध तुटणे अशा सामाजिक समस्या येतात.जीवनशैलीला धक्का लागतो.या सर्व बाबी टाळून एखादे पुनर्वसन होत असेल तर ते पुनर्वसन म्हणजे पुनःसंजीवनी मानावी,असे आवाहन या वेळी आ. श्वेताताई यांनी केले.
2010 च्या शासन निर्णयानुसार या तिन्ही गावांचे पुनर्वसन करण्यास मंजुरी प्राप्त झाली असून नागरी सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.मंजूर शासन निर्णयानुसार बाधित कुटुंबानुसार विस्थापितांना मान्य पुनर्वसन अधिकारी बुलढाणा यांच्याकडून अधिकृत प्लॉटचे वाटप करण्यात आलेले आहे.
पुनर्वसन करताना अनेकदा लोकांना वेळेवर मदत मिळत नाही,ज्यामुळे त्यांचे हाल होतात. सरकारी योजनांची अपुरी अंमलबजावणी झाल्याने पुनर्वसनाच्या योजना व्यवस्थित राबवल्या जात नाहीत.पुनर्वसन प्रक्रिया खूप हळू चालते,ज्यामुळे लोकांना जास्त काळ त्रास सहन करावा लागतो.लोकांना पुन्हा एकत्र आणून त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे.त्यामुळे पुनर्वसन फक्त तात्पुरते नसावे,तर ते दीर्घकाळ चालणारे आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणारे असावे. असे प्रतिपादन यावेळी आ.श्वेताताई महाले यांनी केले.याधनादेश वाटप प्रसंगी शंतनू बोंद्रे,जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  शरद पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा, मिलिंद तांबागडे, अमोल साठे, सुखदेव म्हळसणे, विस्तार अधिकारी उगले, प्रमोद राठोड, अमोल पाटील, प्रल्हाद सुरडकर, मदन वाघ, शारदा म्हळसणे सरपंच करतवाडी, चेतन म्हस्के सरपंच पांढरदेव, संदीप म्हस्के, भारत म्हस्के, सुभाष जाधव व तीनही गावांतील नागरिक उपस्थित होते.


Previous Post Next Post