ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ गुरु मंदिर ट्रस्ट, च्या वतीने भव्य आरोग्य शिबिर( मोफत)

महेश गोंधणे:-दि.२७/५/२०२५ रोज मंगळवार ला सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ गुरु मंदिर ट्रस्ट, डॉ. हेडगेवार आयुर्वेद महाविद्यालय मार्ग,चिखली यांच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे विविध आजारांचे निदान  व त्यावर उपचार होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी सदर शिबिरात उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करावी व शिबिराचा लाभ घ्यावा. 
शिबिरामध्ये EDTA (PURPLE), SERUM /EDTA (RED & PURPLE), SERUM (RED YELLOW),CITRATE (BLUE) या विविध आजारांच्या तपासण्या मोफत होणार आहे तरी आपण याचा लाभ घ्यावा ,असे आवहान ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ गुरु मंदिर ट्रस्टच्या द्वारे करण्यात आले आहे.

Previous Post Next Post