इसरूळ येथे सुरू असलेल्या संत चोखोबरायांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेल्या सोहळ्यास शिवसेना(शिंदे गट)प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहणार.
तालुक्यातील इसरूळ येथे 10 मे पासून सुरू असलेल्या संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळा सुरू झाला असून हभप पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.या सोहळ्याला अयोध्येतिल प्रभू राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष पु.स्वामी गोविंदगिरीदेव महाराज यांचे या निमित्त शिवचरित्र कथा पारायण होत आहे. त्या सोबत दररोज नामवंत कीर्तनकार आपली सेवा देत असून पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे. दि. १८ मे रोजी या पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या इसरूळ येथे आगमन होणार असून, ते संत चोखोबारायांची महाआरती करतील. त्यानंतर ते उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतिल हा दौरा राजकीय नसणारच ना. शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,आ. संजय गायकवाड यांचीदेखील उपस्थिती लाभणार असल्याचे समजते.
