चिखली तहसील कार्यालयाच्या अभिनव उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी मोफत महसुली ग्रंथालयाचे आ.श्वेताताई महाले यांच्या हस्ते उद्घाटन.

भौगोलिक तसेच महसूल मंडळाच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण तालुका असलेल्या चिखली तहसील कार्यालयात कामकाजाकरिता येणाऱ्या नागरिकांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने चिखलीचे तहसीलदार यांनी नागरिकांसाठी मोफत महसुली ग्रंथालयाची सुरुवात करण्याचा एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून या ग्रंथालयाचे उद्घाटन आ.श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
चिखली मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी हे कामकाजाकरिता तहसील कार्यालयात आले असता अनेक प्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयीन कामानिमित्त दौऱ्यावर असतात किंवा कामकाजात व्यस्त असतात, त्यामुळे प्रतीक्षा करण्याऱ्या नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तहसीलदार यांनी शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला असून सदर ग्रंथालयामध्ये महसूल विभागाशी संबंधित कायदे, नियम व अटी-शर्थीसह इतर विविध योजनांबाबत माहिती असणाऱ्या पुस्तकांचा संग्रह करण्यात आलेला आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेचा सदुपयोग होण्यासोबतच त्यांच्या ज्ञानात देखील भर पडेल. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयीन वेळेत या मोफत महसुली ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आव्हान आ.सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी केले.