ग्रामीण भागातील जनतेला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवली जात असून आ. श्वेताताई यांच्या विशेष प्रयत्नांतून चांडोळ येथे मंजूर झालेल्या सोलर पार्कचे लोकार्पण आज आ.श्वेताताई महाले यांच्या हस्ते संपन्न झाले.
या पार्कची विद्युत निर्मिती क्षमता 5 मेगावॅट असेल आणि यासाठी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक शासनाने केली असून या परिसरातील 1648 शेतकऱ्यांना या सौर प्रकल्पाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. च्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात होता.
या सोहळ्यास सर्वश्री देविदास पाटील जाधव भाजपा, ओमसिंग राजपूत शिवसेना, डॉ. तेजराव नरवाडे भाजप, श्रीरंगअण्णा वेंडोले ज्येष्ठ नेते भाजप, चव्हाण महावितरण कार्यकारी अभियंता, पोरे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ॲड. मोहन पवार तालुका अध्यक्ष भाजप, नीलेश देठे रा .कांग्रेस, सतीश भाकरे युवा मोर्चा, प्रताप मेहर ,योगेश राजपूत, विष्णू पाटील वाघ, दिगंबर जाधव, विशाल विसपुते, राजू चांदा, सुरेश धनावत, गजानन देशमुख, पुरुषोत्तम भोंडे, अनिल जाधव, अनिल अपार, सखाराम नेमाडे, विष्णू उगले आदी उपस्थित होते.