बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या टक्कल आजाराचा उलगडा .

बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या टक्कल आजाराचा उलगडा .


चिखली(प्रति):- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील लोकांना अवघ्या तीन दिवसांत टक्कल  पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा आजार झाल्यानंतर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत आहे.




हा आजार नेमका कशामुळे होत आहे? याची माहिती आता समोर आली आहे. तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अतिशय विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे. (Fungal Infection Suspected) इतकेच नाही तर पाण्याची टीडीएस लेव्हल जास्त वाढ़लेली आहे अशे दिसून आले आहे.


असे पाण्याच्या तपासणीदरम्यान उघड झालं आहे. याच कारणामुळे गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता खारपाणपट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केली आहे. पण वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून असे प्रकार सुरु झाला आहे. आता टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याने आरोग्य विभाग शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण करत आहे.

Previous Post Next Post