सेवा संकल्प'मधील २४० मनोरुग्णांचा अनोखा वाढदिवस जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून दिले आधार कार्ड, रेशनकार्ड

 सेवा संकल्प'मधील २४० मनोरुग्णांचा अनोखा वाढदिवस

जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून दिले आधार कार्ड, रेशनकार्ड







 दरवर्षी गणराज्यदिनी २६ जानेवारीला सेवा संकल्प परिवाराच्या वतीने २४० मनोरुग्णांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यात यावर्षी वाढदिवसाची भेट तर विशेष ठरली, मनोरुग्णांना जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आधार कार्ड आणि रेशन कार्ड उपलब्ध करून दिले. या सर्वांना नावासह गावाची ओळख मिळाली आहे.मनोरुग्ण म्हणजे समाजातील हेटाळणीचा विषय,कुठल्या तरी कारणाने मनावर झालेल्या आघाताचा परिणाम मेंदुवर होऊन त्याचे रुपांतर मनोरुग्णामध्ये होते. त्यानंतर त्यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे घरचे देखील त्यांना स्वीकारत नाहीत आणि ते आपली ओळख विसरून देशोधडीला लागतात. त्यांचा जगण्याचा अधिकार संपल्या सारखाच समाज त्यांच्यासोबत वागू लागतो.परंतु पालवे दाम्पत्याने याच मनोरुग्णांच्या वेदना ओळखून त्यांना आधार दिला,त्यांच्यासाठी सेवा संकल्प फुलवून अनेकांना बरे केले,मात्र ते आजपर्यंत या रुग्णांना ओळख देऊ शकले नव्हते.अनेक वेळा प्रशासनाकडे चकरा मारूनही यश मिळाले नाही.दरम्यान,   जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सेवा संकल्प प्रकल्पाला भेट दिली. त्या भेटीत पालवे दाम्पत्याने त्यांच्या समोर समस्या मांडल्यानंतर काहीच दिवसांत या रुग्णांना प्रशासनाच्या वतीने आधार कार्ड आणि रेशन

कार्ड देन्याबाबत निर्णय झाला.बेवारस म्हणून मिळालेले हे रुग्ण विचित्र मानसिकतेत आणि विचित्र अवस्थेत या ठिकाणी आणले जातात.उपचार करून त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.सेवा संकल्पचे सर्वेसर्वा डॉ.नंदू पालवे आणि आरती पालवे यांनी निःस्वार्थ सेवा सुरू करूनही आजपर्यंत या मनोरुग्णांना ओळखच मिळाली नव्हती. त्यांचा जन्म कधी आला,याबाबत कुणाला माहिती नवहती. अखेर २६ जानेवारीला या संपूर्ण रुग्णांना त्यांचा जन्मदिवस असल्याचे सांगत त्यांचादेखील याठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येऊ लागला.यावर्षी २६ जानेवारीला संजयबाबा पाचपोर,आचार्य वेरूळकर गुरुजी, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,सौ.शीला किरण पाटील, राधेश्याम चांडक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात या रुग्णांना आधार कार्ड व रेशन कार्ड मिळाल्याने सेवा संकल्प वरील सर्व रुग्णांना एक नवी ओळख मिळाली.

*"बुलढाणा अर्बन परिवार पाठीशी उभा  राहील"-भाईजी*

प्रकल्पाच्या चांगल्या कामासाठी सकारात्मक राहून सहकार्य करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करतांना दिली.ज्या दिवशी कुणीच नसेल आणि प्रकल्पाचा खर्च करणे शक्य होणार त्या दिवशी बुलडाणा अर्बन परिवार मोठा ताकदीने "सेवा संकल्प" साठी मोठ्या ताकदीने उभा राहील असा ठाम विश्वास बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला, वेरूळकर गुरुजी यांनी देखील नंदु पालवे देवाने घडविलेल्या मूर्तींची सेवा करत असल्याचे सांगितले.

*बरे झाल्यावरही घरचे स्वीकारत नाहीत : नंदू पालवेंची खंत*           मोठ्या कष्टाने आम्ही या रुग्णांना सांभाळतो,ते देखील या ठिकाणी

औषधोपचार झाल्यावर पुन्हा ते पूर्वपदावर येतात. त्यांना घराची ओढ लागते. पण तरीही तरीही कुटुंबीय त्यांचा स्वीकार करत नाही, अशी खंत डॉ नंदू पालवे यांनी व्यक्त केली.त्यामुळे पूर्वपदावर आलेल्या या रुग्णांना एक गाव असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.शासनाने जमीन उपलब्ध करून दिल्यास मनोरुग्णांसाठी एक गाव बसविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमा साठी पुणे,अकोला,वाशिम, नागपूर येथील सेवा संकल्प शी जुळलेले अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक प्रा. निशिकांत ढवळे यांनी केले.सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार डॉ. नंदकुमार पालवे यांनी मानले.


Previous Post Next Post