चिया सिड्सला फुलांचा बहर...
दिग्रस : तालुक्यातील हरसूल येथील प्रयोगशील शेतकरी आशिष काळे यांनी आपल्या शेतात पाच एकरात चिया सिड्सची लागवड केली. या पिकाला फुलांचा बहर आला असून लवकरच पीक हाती येणार आहे. विशेष बाब म्हणजे या पिकाला खत व कीटकनाशक फवारणीची आवश्यकता नसल्याने केवळ पाणी व निंदणाच्या भरोशावर हे पीक बहरले आहे.
