चिखली (महेश गोंधणे):-पेठ येथे 35 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या पूलाचे आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते लोकार्पण...
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण मानल्या जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आज दिनांक ६ जुलै रविवार रोजी पुणे नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे पेठ तालुका चिखली येथे केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री ना.श्री नितीनजी गडकरी यांच्या विशेष मार्गदर्शनाने व सहकार्याने बांधण्यात आलेल्या 35 कोटी रुपयांच्या पुलाचे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आ. सौ.श्वेताताई.महाले यांनी माणसे जोडणारी नियती,व गावे जोडणारे रस्ते पूल बनवणारी यांत्रिकी या सरकारची व भाजपाची संस्कृती असल्याचे प्रतिपादन केले. यापूर्वी पायाभूत सुविधांसाठी भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अभाव असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचे बरेच नुकसान झाले आहे",लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापर्यंतच मर्यादित नव्हत्या तर त्यात शेती, व्यवसाय आणि उद्योगांचाही समावेश होता, याकडे आ. सौ. श्वेताताई महाले यांनी लक्ष वेधले.
मूलभूत सुविधांसोबतच आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मितीही तितकीच महत्त्वाची असल्याचे आ. सौ. श्वेताताई महाले यांनी सांगितले. जे मतांचे राजकारण करतात ते देशाचे भविष्य लक्षात घेऊन योजना आखू शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या. यापूर्वी दोन ते तीन वेळा केंद्र सरकारकडून या पुलासाठी निधी मंजूर झाला होता परंतु स्थानिक राजकारण्यांना देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेची नाडी असलेले पूल व रस्ते यांचे महत्त्व न कळल्यामुळे हा पैसा न वापरता परत गेला. गरजा वाढत असताना त्या पूर्ण करण्यासाठी फार लवकर कमी पडणाऱ्या वा सोयीसुविधा निर्माण न करण्याच्या काँग्रेसी संकुचित विचारावर त्यांनी टीका केली. अशा विचारामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले, असे आ. सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
चिखली मतदारसंघात जेथे वाहतुकीची अडचण आहे तेथे पूल व रस्ते बांधून ही समस्या आधी दूर केल्यामुळे इतर अनेक कामे मार्गी लागतात. या पुलाचे बांधकाम करताना जमिनी संपादित करताना सात शेतकऱ्यांच्या गट बदल झाल्यामुळे मोबदल्याच्या काही शिल्लक अडचणी येथे होत्या.याअडचणींचा बाऊ न करता आमदार म्हणून मा.नितीनजी गडकरी यांच्या कानावर या अडचणी टाकल्या, महाराष्ट्राची सुपुत्र असलेले व देशाचे सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून नावलौकिक असलेले ना. गडकरी साहेबांनी स्थानिक जिल्हाधिकारी यांच्यासोबत बऱ्याच वेळा मीटिंग घेऊन हा पूल कसा तयार होईल त्या संदर्भातील सर्व अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन व प्रयत्न केले. त्याची परिणीती म्हणून आज या पुलाचे लोकार्पण माझ्या हस्ते होत आहे यासाठी मी ना.गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतेअसेआ.सौ.श्वेताताई महाले म्हणाल्या.
मागील 25 वर्षापासून या ठिकाणी योग्य पुलाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा जीवितहानीसारखे अपघात झाले. परंतु असंवेदनशील काँग्रेस सरकार आणि त्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना याबाबतीत कधी सोयर सुतक राहिलेले नव्हते. आम्ही लोकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मागील लोकप्रतिनिधीने आपल्या सोयी सुविधेसाठी लोकांचा वापर केला. एवढ्या महत्त्वाच्या पुलासाठी काही महसुली सुधारणा करून हा पुल बनवणे व त्यायोगे त्या अभावी झालेल्या जीवितहानी रोखणे हा लोकप्रतिनिधीचा प्रयत्न असायला हवा परंतु या अगोदर आलेले पैसे का परत गेले? हा मोठा विषय आहे असे आमदार सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
अतिशय उपयुक्त सुमारे 35 कोटी किंमत असलेला हा पूल बनवताना स्थानिक कंत्राटदार,शासकीय अधिकारी व संबंधित पदाधिकारी सगळ्यांनीच अतिशय तत्परतेने व मानवीय दृष्टिकोनातून चिखली खामगाव राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी सी वरील पेठ गावा जवळील पैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या कामात सकारात्मक सामाजिक दायित्वाची अधिक कामे जी कंत्राटामध्ये उल्लेखित नव्हती ती सुद्धा केली.जसे अस्तित्वातील दुर्लक्षित दगडी बंधारा नूतनीकरण करून नवीन काँक्रीट भिंतीचे काम करून पाणी अडविले. वरील बाजू साफ करून खोलीकरण करण्यात आले. या बंधाऱ्यात आधी जलसाठा होत नव्हता तो आता ९ सहस्त्र घन मीटर (TMC) एवढा झाला आहे. प्रचलित दरा प्रमाणे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीस जवळ जवळ २० लक्ष एवढा खर्च आला असून या बंधाऱ्यामुळे त्याच्या खालच्या बाजूच्या १५ एकर जमिनीतील विहिरी रिचार्ज झाल्या. आता या १५ एकर जमिनीत रबी चे पीक घेणे शक्य झाले आहे.
रिव्हर ट्रेनिंग मधून निघालेला नदीच्या काठावरील गाळ/माती शेतकऱ्यांनी त्यांच्या मुरमाळ व पोटखराब जमिनीत टाकली. आता शेतकऱ्यांनी या जमिनीत सोयाबीन पेरले आहे. पुलाच्या कंत्राटदाराने नदीच्या काठावर साचलेला गाळ मशीनने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मध्ये भरून दिला व शेतकऱ्यांनी तो त्यांच्या न पिकणाऱ्या जमिनीत टाकला. काही क्षेत्रात कंत्राटदाराने त्याच्या स्वतःच्या मशिनरीने गाळाची वाहतूक करून दिली व तो गाळ पसरवूनही दिला. थोडक्यात नदीचे रुंदीकरण होऊन पुराचे पाणी आजूबाजूचे शेतात पसरण्याची शक्यता कमी झाली. काही एकर जमीन पिकाऊ झाली आणि ती ही विनाखर्चाने
उतरादा पाझर तलावातून मुरूम काढून या पुलाच्या पोच मार्गाच्या भरावास वापरण्यात आला.यामुळे या पाझर तलावाची साठवण क्षमता ३० सहस्त्र घन मिटर ने वाढली.असून जलसंधारणाचे काम विनामूल्य होऊन शासनाची ५४ लक्ष रुपयांची बचत झाली. तसेच याचा फायदा उतरादा या गावाच्या पाणीपुरवठा योजनेस सुद्धा होणार आहे.
या पुलाच्या पोचमार्गावर वृक्षारोपण काही लांबीत झाले. उर्वरित लांबीत ते करण्यात येत आहे.
या कामाच्या कारारनाम्या प्रमाणे वरील कामे करणे अपेक्षित नव्हते परंतु सामाजिक बांधीलकी ठेऊन कंत्राटदाराने ही कामे विनामूल्य केली.
या लोकार्पण प्रसंगी डॉ. प्रतापसिंह राजपूत प्रदेश कार्यकारणी सदस्य, अंकुशरावजी पडघान, कृष्णकुमार सपकाळ ता. अध्यक्ष, शिवाजीराव देशमुख उपजिल्हाप्रमुख शिवसेना, माया म्हस्के शिवसेना महिला.आ.जिल्हाप्रमुख, सरपंच विष्णू शेळके, एकनाथ जाधव,बबन राऊत,बळीराम काळे,सौ सिंधु तायडे,अंकुश तायडे, माजी सरपंच सुलाबाई शेळके व महायुतीचे कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.