तोरणा गुरूकुलमध्ये श्लोक पठन सोहळा उत्साहात साजरा.

(महेश गोंधणे):- दि:-१९/०७/२०२५शनिवार रोजी तोरणा गुरूकूल सीबी एस सी शाळा उदयनगर येथे श्लोक पठन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ऋषीकेश गडम,निलेश नखोद सर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक विनोद वाघ,प्राध्यापक-राम गुंड उपस्थित होते. 
विद्यार्थ्यांनी यावेळी संस्कृत श्लोक सांगुन त्यांचे अर्थ यांचे स्पष्टीकरण दिले.विद्यार्थ्यांनी गीता,ज्ञानेश्वरी या ग्रंथातील श्लोकाचे प्रकटीकरण केले.यावेळी प्राध्यापक विनोद वाघ यांनी मुलांना भगवद गीतेची महती दिली,मराठी अस्मिता,संस्कृती जोपासने ही काळाची गरज आहे,तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक अभ्यासाविषयी,बालसंस्कार, सर्वागीण व्यक्तीमत्व विकासासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.प्राध्यापक- राम गुंड यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी मधील श्लोक सांगुन त्यांचे अर्थ यांचे प्रकटीकरण केले.भारतीय संस्कृतीमधील संस्कृत श्लोक यांबद्दल विद्यार्थ्यांना आवड निर्माण करणे,तसेच विद्यार्थ्यांनमधील वकृत्व कौशल्य विकसित करणे.हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
Previous Post Next Post