शेतीला निव्वळ निसर्गाच्या भरवशावर न सोडता शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी आज चिखली पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय खरीप हंगाम 2025-26 पूर्वनियोजन आढावा बैठक घेतली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सज्जतेच्या सूचना दिल्या.
साठा उपलब्ध करा, साठेबाजी रोखाः बियाणे व खतांचा पुरेसा साठा वेळेवर उपलब्ध करून काळाबाजार रोखण्यासाठी नियोजन करावे.
रुंद सरी वरंब्यावर पेरणी आवश्यकः सर्व शेतकऱ्यांना रुंद सरी वरंब्यावर पिकांची पेरणी करण्यास प्रोत्साहित करावे.
सोयाबीनकडे लक्ष द्याः महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NSC), विविध बीजोत्पादन कंपन्या, बियाणे विक्रेते यांच्या मार्फत सोयाबीनचे सुधारित व उन्नत वाणांचे बियाणे उपलब्ध करून द्यावे.
रोगांना आळा घालाः तालुक्यात सर्व बीजप्रक्रिया मोठ्या प्रमाणात करून घेण्यात यावी.
फळपिकांची लागवड व्हावीः तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनुदान तत्त्वावर फळपिकांची लागवड करण्यात यावी. तसेच बांबू लागवड वाढवण्यावर भर द्यावा.
खते द्या, लिंकिंग थांबवाः रासायनिक खतांच्या मागणीनुसार खतांची उपलब्धता राहील याची दक्षता घ्यावी. लिंकिंग व काही गैरप्रकार, तक्रारींसाठी दक्षता पथके तैनात ठेवावीत. त्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करावेत.
पीकविमा आवश्यकचः चिखली तालुक्यामध्ये पिकविमा योजनेचा प्रचार, प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी.
पीककर्ज पेरणीपूर्वी द्याः शेतकऱ्यांना पीक कर्ज पेरणीपूर्वी वेळेत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बँका व सहकार विभागाने करावी. कुठलाही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये.
अनुदान थेट खात्यात जमा कराः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
जनजागृतीसह योजना पोहचवाः किडी व रोगांची शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन जनजागृती करावी. 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा', कृषी सोलर पंप, पीक विमा आदींचा लाभ घरोघरी पोहोचवण्याच्याही अश्या सूचना आ.श्वेताताई महाले यांनी संबंधितांना दिल्या.