बुलढाण्यामध्ये सर्व जातीय वधु- वर परिचय मेळावा संपन्न व पुरस्काराचे वाटप.

 चिखली(महेश गोंधणे):-सामाजिक न्याय सभागृहामध्ये दिनांक ०५-१०-२०२५ रोजी जातीय घटस्फोटीत विधवा वधू वर परिचय मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.   कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  बुलढाण्याचे आमदार संजया गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पाटील  तसेच संत कबीर जेष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठलराव धोंडूराव जाधव,डॉ मंजू राजे जाधव, रूपालीताई एनजीओ फेडरेशन ,डॉ गजेंद्र निकम,डॉ गणेश गायकवाड,अनुभूती अर्बनचे अध्यक्ष चौरे सर व एडवोकेट रूपालीताई चौधरी,शिवसेनेच्या तालुकाध्यक्ष चिखली उपस्थित  होते. प्रमुख उपस्थितीमध्ये केळवद गावचे माजी सरपंच प्रल्हाद भारुडकर,उज्वला काळे पर्यटन संचालनालय अमरावती ,अहिल्यानगर येथून रणरागिनी फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा रोहिणी पवार ,फिटनेस क्लबच्या अध्यक्षा आम्रपाली अवसरमोल ,कविवर्य डॉ मंजुराजे जाधव सामाजिक कार्यकर्ते शाहीना ताई पठाण, कार्यक्रमा च्या मुख्य आकर्षण ९६ वर्षाच्या श्रीमती तुळसाबाई धोंडूजी जाधव यां ज्येष्ठ नागरिक आईचा  सन्मान करून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.      त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला .महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली संस्थेचे अध्यक्ष डॉ निवृत्ती जाधव व आमदार संजया गायकवाड सर्वप्रमुख उपस्थिती यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.नंतर पुरस्कार वितरण सोहळा संपन झाला.  कलावंत ,साहित्यिक, पत्रकार,कवी ,क्रीडा ,सेंद्रिय शेतीभूषण,उत्कृष्ट सरपंच ,उत्कृष्ट पोलीस  अधिकारी ,उत्कृष्ट गायक, वन्यजीव सोयरे ,सर्पमित्र , गौरक्षक,वकील,डॉक्टर, इंजिनीयर,आर्टिस्ट,जादूगर, संबळ वादक,सामाजिक, शैक्षणिक  इत्यादी २५ पुरस्काराचे वितरण करण्यात .महाराष्ट्रभरातून ३६ जिल्ह्यांमधून मान्यवर  पुरस्कारती या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विधवा घटस्फोटीत वधू- वर परिचय मेळाव्यामध्ये ७० नावांची नोंदणी झाली असून त्यामध्ये एक आंतरजातीय विवाह सुद्धा ठरलेला आहे.तसेच वधु वर परिचय मेळावा होणं गरजेचं असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ निवृत्ती जाधव यांनी कार्यक्रमांमध्ये सांगितले.संजीवनी संस्था गेल्या १८ वर्षापासून समाजामध्ये शोषित, पिढीत ,गरजू ,गरीब ,अज्ञानी, अशिक्षित कुटुंबासाठी काम करते. तसेच ०५ मे रोजी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केळवद येथे सातत्याने करीत आहे. संजीवनी संस्थेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते  सामाजिक न्याय विभागाचे उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले असून २०२५ चा जिल्हा युवा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्या अनुषंगाने समाजातील समाजासाठी शेवटच्या घटकासाठी काम करणाऱ्या पुरस्कार्थ्यांन पुरस्कार देऊन संस्थेने सन्मानित केले आहे. याप्रसंगी या कार्यक्रमाला सूत्रसंचालक म्हणून गुरुवर्य पंजाबराव टेकाळे सर यांनी सूत्रसंचालन केले आहे व आपली कला आपले लोकगीत भावगीत हे शाहीर गणेश कदम यांनी आपल्या वाणीतून केले आहे कवी वर्य मंजुताई जाधव यांनी आपली कविता सादर केली आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगीता निकम यांनी केले.व कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी एनजीओ फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष अलका खांडवे यांनी अथक परिश्रम घेतले. 
Previous Post Next Post